टोल फ्रि १९५० क्रमांकावर ९५२ जणांचा संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:42 IST2019-04-27T20:42:14+5:302019-04-27T20:42:26+5:30
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत मतदारांना माहिती देण्यासाठी १९५० या क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आतापर्यंत ९५२ जणांना ...

टोल फ्रि १९५० क्रमांकावर ९५२ जणांचा संपर्क
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत मतदारांना माहिती देण्यासाठी १९५० या क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आतापर्यंत ९५२ जणांना आवश्यक माहिती दिली गेली.
मतदान अधिक पारदर्शक आणि मुक्त वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा यासाठी त्यांना प्रोत्साहीतदेखील करण्यात येत आहे. नागरिकांनी १९५० हा नंबर डायल केल्यावर त्यांना मतदानाविषयी आवश्यक माहिती देण्यात येते. तसेच या क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या निवडणूक विषयक तक्रारींची दखलदेखील तात्काळ घेण्यात येते. आतापर्यंत या क्रमांकावर प्राप्त झालेल्या ६२ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. माहितीसाठी किंवा निवडणूक विषयक काही शंका असल्यास १९५० क्रमांकाच्या सुविधेचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले आहे.