ुेबोंडअळीग्रस्त शेतक:यांना मदतीसाठी89 कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:13 IST2018-05-11T12:13:15+5:302018-05-11T12:13:15+5:30

ुेबोंडअळीग्रस्त शेतक:यांना मदतीसाठी89 कोटींचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गेल्या खरीप हंगामात 90 हजार हेक्टरवरील कापूस बोंडअळीमुळे खराब झाला होता़ या कापसाचे पंचनामे करून कृषी विभागाने राज्य शासनाकडे अहवाल दिला होता़ यावर निर्णय देत शासनाने जिल्ह्यातील शेतक:यांना 89 कोटी रूपयांची मदत जाहिर केली आह़े तीन टप्प्यात जिल्ह्यातील शेतक:यांना ही रक्कम मिळणार आह़े
जिल्ह्यात यंदा 1 लाख 18 हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती़ सुरूवातीच्या पहिल्या टप्पयातील वेचणी यशस्वी झाल्यानंतर ठिकठिकाणी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता़ यामुळे नाईलाजाने शेतक:यांना शेतातील कापूस काढून फेकून द्यावा लागला होता़ यामुळे ब:याच शेतक:यांना उत्पादन आले नव्हत़े या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने 31 जानेवारीअखेर पूर्ण केले होत़े यात 95 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेला कापूस शेंदरी बोंडअळीने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होत़े यानुसार शेतकरी शासनाच्या तिहेरी मदतीला पात्र ठरले आहेत़
याबाबत शेतकरी संघर्ष समितीने पाठपुरावा केला होता़ शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एम़एस़पन्हाळे यांनी संघर्ष समितीचे अभिजीत पाटील यांना शासन निर्णयाची प्रत दिली़ यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एम़एस़रामोळे, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, शिवाजी पाटील, संदीप पाटील, अमोल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होत़े