८७ सरकारी रुग्णवाहिकेतून रुग्णांची केली जातेय वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:45 IST2020-07-31T12:45:11+5:302020-07-31T12:45:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सेवेला महत्त्व प्राप्त झाले आहे़ आरोग्य यंत्रणा अधिक बळकट व्हावी ...

८७ सरकारी रुग्णवाहिकेतून रुग्णांची केली जातेय वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सेवेला महत्त्व प्राप्त झाले आहे़ आरोग्य यंत्रणा अधिक बळकट व्हावी यासाठी प्रयत्न होत आहेत़ यात रुग्णांची वाहतूक करणाऱ्या सुसज्ज रुग्णवाहिकांची संख्या वाढ करण्याची गरज असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर्स आणि जिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून १०८ रुग्णवाहिका वापरण्यात येत आहेत़ तर तालुका मुख्यालयी असलेले कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटर या ठिकाणी जोखीमीच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना घेऊन जाण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात वापरण्यात येणाºया रुग्णावाहिका देण्यात आल्या आहेत़ याखेरीज जिल्ह्यातून रुग्ण बाहेर रवाना करणे आणि जिल्हांतर्गत कामांसाठी आदिवासी विकास विभागाच्या अटल रूग्णवाहिकांचा वापर करण्यात आहे़ सहा तालुक्यांच्या विविध भागात धावणाºया या रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने सातत्याने पाठपुरावा केला असला तरीही अद्याप नवीन वाहने मिळालेली नाहीत़ तूर्तास सर्व सहा तालुक्यातील १० क्वारंटाईन सेंटर, नंदुरबार आणि शहादा येथील कोविड सेंटर, ११ ग्रामीण रुग्णालय, ६० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दोन उपजिल्हा रुग्णालय याठिकाणीही नियमित रुग्णवाहिकांची गरज असून यात पालिकांच्या दोन-तीन रुग्णवाहिका चालवण्यात येत आहेत़ जिल्ह्यात खाजगी रुग्णवाहिकांची संख्या ही अत्यंत कमी असून आॅक्सिजन युक्त सोयींसह केवळ १०८ रुग्णवाहिकाच असल्याचे चित्र आहे़ यामुळे येत्या काळात जिल्ह्यासाठी सुसज्ज अशा रुग्णवाहिकांची गरज पडणार आहे़
४नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्ष आणि जनरल रुग्णांसाठी १०८ च्या १४ रुग्णवाहिका चालवण्यात येत आहेत़ जिल्हा रुग्णालयाकडे स्वत:च्या ४ रुग्णवाहिका आहेत़ या १८ रुग्णवाहिकांवर सध्या संपूर्ण भार आहे़ १०८ रुग्णवाहिका जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातही जात असल्याने बºयाचवेळा प्रशासनाची धावपळही होते़ परंतु नियोजन करत असल्याने अडचणी दूर होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़
४आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांसाठी खरेदी केलेल्या १३ अटल रुग्णवाहिकाही सध्या कोरोनाड्यूटी बजावत आहेत़ यातील तीन रुग्णवाहिका ह्या नंदुरबार तर तीन शहादा कोविड सेंटरसाठी राखीव आहेत़ उर्वरित रुग्णवाहिका ह्या क्वारंटाईन सेंटर्सला देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़
दरम्यान जिल्हा रुग्णालयाने गर्भवती माता आणि इतर आजाराच्या गंभीर रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका ह्या राखीव ठेवल्या आहेत़ उर्वरित दोन रुग्णवाहिका ह्या शववाहिनी म्हणूनही वापरण्यात येत आहेत़
जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य आणि आदिवासी विकास विभागाने दिलेल्या सर्व ८७ रूग्णवाहिका ह्या पूर्णपणे निशुल्क पद्धतीने दिल्या जातात़ कोणत्याही रुग्णाकडून भाडेवसुली केली जात नाही़ शासनाकडून या रुग्णवाहिकांचा पूर्णपणे देखभाल दुरूस्तीचा खर्च केला जात आहे़
सरकारी रूग्णवाहिकांसोबत नगरपालिका, लोकप्रतिनिधी तसेच सेवाभावी संस्था आणि खाजगी भाडेतत्त्वावर ६० च्या जवळपास रूग्णवाहिका चालवण्यात येत आहेत़ सेवाभावींकडून एक रुपयाचाही आकार भाडेपोटी केला जात नसल्याचे सांगण्यात आले आहे़
४तसेच खाजगी रुग्णवाहिका चालक हे केवळ परवानाधारक रुग्णांचीच सध्या जिल्ह्याबाहेर वाहतूक करत असल्याची माहिती देण्यात आली आहे़