जिल्ह्यात दोन कारवाईत 81 लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:29 IST2019-09-05T12:28:58+5:302019-09-05T12:29:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एलसीबी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्रीवर केलेल्या धडगाव येथील वेगवेळ्या कारवाईत ...

जिल्ह्यात दोन कारवाईत 81 लाखांची दारू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एलसीबी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्रीवर केलेल्या धडगाव येथील वेगवेळ्या कारवाईत 81 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहादा ते धडगाव रस्त्यावर रामपूर शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत मालट्रकसह एकुण 58 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहन चालक मुजफ्फर हसन पिंजारी रा.वकवाल, ता.शिरपूर, फुर्ता आरशी वसावे, रा.जुनी वाण्याविहिर, ता.अक्कलकुवा यांना ताब्यात घेण्यात आले तर उदयसिंग सेल्या पावरा, रा.हरणखुरी, ता.धडगाव, कमलेश सुरेश जयस्वाल, रा.पळासनेर, ता.शिरपूर हे फरार झाले.
दुसरी कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने केली. धडगाव ते जलोला रस्त्यावर सोनगाव येथे कारवाई करण्यात आली. चार वाहनांमध्ये विदेशी बनावटीची दारू आढळून आली. एकुण 22 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फतत्तेसिंग नाना पाडवी, रा.खुंटामोडी, जोरदार धन्या पाडवी रा.चिंचखेडी व जया पाण्या वळवी रा.हालगव्हाण, ता.धडगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले व पथकाने केली.