सारंगखेडा येथे 77 जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:14 IST2019-09-04T12:14:12+5:302019-09-04T12:14:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील नवयुवक गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिर व वृक्ष वाटपाचा शुभारंभ जिल्हा ...

77 donated blood at Sarangkheda | सारंगखेडा येथे 77 जणांनी केले रक्तदान

सारंगखेडा येथे 77 जणांनी केले रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील नवयुवक गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिर व वृक्ष वाटपाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरात 77 जणांनी रक्तदान केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, ज्येष्ठ समाज सेवक उत्तम पाटील, रमेश पाटील, सुरेश कुवर, डॉ.ओंकार पाटील, भरत पाटील, रवींद्र पाटील, सी.एम. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर पाटील, नवयुवक मित्र मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. या वेळी मंडळातर्फे मान्यवरांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी सांगितले की, आमच्या आवाहनाला मंडळाने साथ देत रक्तदान शिबिर व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेतला. दरम्यान जयपालसिंह रावल, ज्येष्ठ समाज सेवक उत्तम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. 
दरम्यान रक्तदान शिबिरात 77 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे सुनील चौधरी, रोहित जाधव, सुभाष खैरनार, पल्लवी इंगळे, अंकिता बेडसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात चेतक फेस्टीवल समिती व सारंगखेडा पोलीस ठाण्यातर्फे नवयुवक गणेश मंडळाचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन आर.बी. राजपूत तर आभार जितेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी मंडळाचे पदाधिकारी व गुजर समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Web Title: 77 donated blood at Sarangkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.