मोड येथे ७२ हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST2021-03-08T04:29:42+5:302021-03-08T04:29:42+5:30

कोठार : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तळोदा तालुक्यातील मोड येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई ...

72,000 gutkha seized at Mod | मोड येथे ७२ हजारांचा गुटखा जप्त

मोड येथे ७२ हजारांचा गुटखा जप्त

कोठार : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तळोदा तालुक्यातील मोड येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करत ७२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. दरम्यान, कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रानुसार, तळोदा तालुक्यातील मोड येथील राकेश रामराव पाटील याने आपल्या राकेश किराणा मर्चंट या दुकानात एका पांढऱ्या रंगाच्या कट्ट्यात विविध प्रकारच्या गुटखा व तंबाखूच्या पुड्या महाराष्ट्रात तंबाकूजन्य व गुटखा विक्री प्रतिबंध असताना विक्रीच्या उद्देशाने भरून ठेवल्या होत्या. या पांढरा रंगाच्या कट्यातून एकूण ६० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त केला आहे.

दुसऱ्या कारवाईत मोड गावातील आरोपी केवरराम सोनाराम चौधरी याने देखील आपल्या किराणा दुकानात विक्री करण्याच्या हेतूने ११ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा ठेवलेला आढळून आला. ही कारवाई मोड गावात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबारतर्फे करण्यात आली. याबाबत तळोदा पोलिसात स्था.गु.अ. शाखा नंदुरबारचे पो.ना सुनील तेजसिंग पाडवी यांनी फिर्याद दिल्यावरून राकेश रामराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.स.इ. अभय मोरे हे करीत आहे. तर विशाल नागरे याने दिलेल्या फिर्यादीवरून केवरराम चौधरी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करत आहे.

Web Title: 72,000 gutkha seized at Mod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.