72 जोडप्यांचे झाले सामुहिक शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:51 IST2019-05-12T20:51:20+5:302019-05-12T20:51:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सहाय्यक धमार्दाय आयुक्त व जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह ...

72 जोडप्यांचे झाले सामुहिक शुभमंगल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सहाय्यक धमार्दाय आयुक्त व जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयात तब्बल 72 जोडप्यांचे लग्न लावण्यात आले.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक िववाह सोहळयाला जिल्हा सत्र न्यायाधीश आर एस गुप्ता, जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय पाटील, सहाय्यक धर्मदाय आयुक्त सुधीर वानखडे, देवमोगरा एज्यूकेशन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, नुंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघूवंशी, अंनिसचे जिल्हाध्यक्ष हैदरअली नुरानी, विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष गोपाळराव शिंपी, उपाध्यक्ष रविशंकर शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
वरांची आधी ट्रॅक्टरने शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर आधी ख्रिश्चन पध्दतीने व नंतर वैदीक पध्दतीने वधू वरांचे लग्न लावण्यात आले. जिल्हयातील 72 जोडपे या विवाह बंधनात अडकली. राजेंद्रकुमार गावित यांनी प्रत्येक जोडप्यांना कपडे, मनिष अग्रवाल यांनी प्रत्येक वधूंना एक ग्रॅमचे प्रत्येक एक मंगळसुत्र,शनिमांडळ येथील शनिश्वर मंदिर ट्रस्टच्यावतीने भोजनासाठी 70 हजार तर रविशंकर शर्मा यांनी वधूवरांना भांडयांची मदत केली. तसेच मनोज रघूवंशी यांनी संस्था व वैयक्तीक अशा दोन पध्दतीने आर्थिक मदत केली. पोलिस बँडने विवाह सोहळयास अधिक जाण आणली. आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली. आधी ख्रिश्चन पध्दतीने व नंतर वैदीक पध्दतीने लग्न लावण्यात आले.
विवाह सोहळयाचे प्रास्ताविक सहाय्यक धमार्दाय आयुक्त सुधीर वानखडे, गोपाळराव शिंपी यांनी केले. विश्वजीत क्षिरसागर यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार देविंसिंग राजपूत यांनी मानले. सामुहिक विवाह सोहळ्यात सर्व धर्मीय जोडपे सहभागी झाले होते. त्यात ािश्चन समाजातील जोडप्यांचाही समावेश होता. वैदीक पद्धतीने आणि ािश्चन पद्धतीने यावेळी विवाह लावण्यात आले. जे. एच. पठारे ,आर. के. वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली 26 ख्रिश्चन जोडप्यांचे ख्रिश्चन पध्दतीने विवाह लावण्यात आले. 72 जोडप्यांचे नातेवाईक या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.