निझर येथील शिबिरात ७१ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:19+5:302021-07-21T04:21:19+5:30
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत आणि विविध शहर ग्राम गुजर पाटीदार ग्लोबल मित्रमंडळ यांच्या संयुक्त ...

निझर येथील शिबिरात ७१ दात्यांनी केले रक्तदान
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत आणि विविध शहर ग्राम गुजर पाटीदार ग्लोबल मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निझर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सरदार वल्लभ पटेल यांच्या प्रतिमेला निझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, प्रांत अधिकारी देसाई, सरपंच लतेश नाईक, उपसरपंच संदीप पटेल, अखिल भारतीय गुजर महासभा गुजरात उपाध्यक्ष सुनील पटेल, कार्यकारी उपाध्यक्ष जगदीश पटेल, भाजप तालुका उपाध्यक्ष सचिन पटेल, सुशील जैन, भावेश पटेल, गिरीश पटेल, कैलास पटेल, नीलेश पटेल, सुदाम पटेल, हिरालाल पटेल, राजू पटेल, अमरीश पटेल, अजय पटेल, डॉ.पुंजू पटेल, छोटू पटेल, पमन पटेल, मनीष पटेल, राकेश पटेल यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी महिला, पुरुष, तरुणी, तरुण मित्र मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरात एकाच कुटुंबातील पती-पत्नी यांनी रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदविला, भावेश पटेल व पत्नी जिग्ना पटेल यांनी रक्तदान केले.
विविध संघटना आणि व्यक्तींच्या सहभाग
लोकमत, व्हीसीजीजीएम बरोबरच वेळदा, निझर, वाका, चिंचोदा, सरवाळा ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पूना सिरोंलॉजिकल ब्लड बँकेचे उद्धव पाटील, बिपीन पाटील आणि टीम उपस्थित होते.