वेरी येथील शिबिरात ७०६ जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:14+5:302021-06-02T04:23:14+5:30
वेरीच्या आमलीपाडा येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात मोठा मंडप टाकून शिबिरार्थींची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराचे उद्घाटन सरपंच इमाबाई भरतसिंग ...

वेरी येथील शिबिरात ७०६ जणांनी घेतली लस
वेरीच्या आमलीपाडा येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात मोठा मंडप टाकून शिबिरार्थींची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराचे उद्घाटन सरपंच इमाबाई भरतसिंग तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी नरोत्तम बिऱ्हाडे, केंद्रप्रमुख बकाराम गावित, मुख्य सेविका सरला वळवी, भरतसिंग आरशी तडवी, सुकलाल महाराज, धीरसिंग वसावे, ग्रा.पं. सदस्य सोन्या तेजला वसावे, रामसिंग वसावे आदींची उपस्थिती होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे यांच्या देखरेखीखाली जालमसिंग वसावे, आरोग्य सेवक राजेंद्र डोलार, मुक्ता पाडवी, अरुणा किराडे, व्ही.बी. पाडवी, एस.बी. तडवी, के.जे. वळवी व एस.एम. वळवी यांनी शिबिरार्थींना लस दिली. शिबिरासाठी युनिसेफचे जिल्हा समन्वयक जितेंद्र वळवी यांच्यासोबत त्यांचे सहकारी रवींद्र वळवी, जयसिंग वसावे, प्रदीप पाडवी यांनी लोकांना समुपदेशन करून लसीकरणास प्रवृत्त केले. केंद्रप्रमुख गावित यांनी गेल्या आठ दिवसांपासून काठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी पाड्यापाड्यांवर फिरून लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन सर्वांची नोंदणी करून घेतली होती. ग्रामपंचायतीकडून शिबिरार्थींच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरणस्थळी येण्यासाठी महिला व पुरुषांना स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराला जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी व गटशिक्षणाधिकारी रमेश देसले यांनी भेट देऊन शिक्षक व आशा सेविकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. लसीकरणासाठी युनिसेफचे जितेंद्र वळवी व त्यांचे सर्व सहकारी, प्रा.आ. केंद्र काठीचे डॉ. कुलदीप ठाकरे व त्यांचे सर्व सहकारी, काठी केंद्रातील जि.प. शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी मालसिंग वसावे व आशासेविकांचे सहकार्य लाभले.