मोरथुवा येथे ७० हजाराचे लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 15:49 IST2020-10-02T15:48:47+5:302020-10-02T15:49:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : मोरथुवा येथून वन विभागाच्या पथकाने ७० हजार रुपये किंमतीचे अवैध तोडीचे साग व शिसम ...

मोरथुवा येथे ७० हजाराचे लाकूड जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : मोरथुवा येथून वन विभागाच्या पथकाने ७० हजार रुपये किंमतीचे अवैध तोडीचे साग व शिसम चौपाट जप्त केले.
वन विभागाच्या सूत्रानुसार मिळालेल्या गुप्त बातमीवरून नवापूर चे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी कर्मचा?्यांसमवेत शासकीय वाहनाने मौजे मोरथुवा येथील संशयित इसम मोहन गावीत यांचे घराची व परिसराची सर्च वारंटने झडती घेतली. त्या ठिकाणी रंधा मशिन, ताज्या तोडीचे साग व शिसम चे २० चौपाट नग आढळून आले. सुमारे ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला. घटनास्थळी संशयित आरोपी मिळून आला नाही. जप्त केलेला मुद्देमाल नवापूर आगारात जमा करण्यात आला. वनरक्षक कुकरान यांनी फिर्याद दिली. उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, विभागिय वनाधिकारी दक्षता पथक धुळे, सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल कामोद करित आहे.