बँकेच्या खात्यातून परस्पर 70 हजार काढून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:00 IST2019-04-18T11:59:30+5:302019-04-18T12:00:11+5:30
अज्ञाताचे कृत्य : शहाद्यातील घटना

बँकेच्या खात्यातून परस्पर 70 हजार काढून फसवणूक
नंदुरबार : अज्ञात व्यक्तीने बँकेच्या खात्यातून परस्पर 70 हजार काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार शहादा येथे उघडकीस आला आह़े 10 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता़
लोणखेडा ता़ शहादा येथील नितीन सुदाम चौधरी यांचे स्टेट बँकेच्या शहादा शाखेत खाते आह़े 10 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या खात्यातून 70 हजार रुपये वजा झाल्याची माहिती त्यांना मिळाली़ त्यांनी बँकेत चौकशी केली असता, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून ही रक्कम परस्पर काढून घेतल्याची माहिती समोर आली़ याप्रकरणी नितीन सुदाम चौधरी यांनी मंगळवारी रात्री उशिराने शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक वळवी करत आहेत़