नंदुरबारात आजवर ७० हजार क्विंटल मिरची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:44+5:302021-02-08T04:27:44+5:30
२०१९-२० च्या हंगामात बाजारात एकूण १ लाख ६९ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती. या आवकमुळे २०२१ या ...

नंदुरबारात आजवर ७० हजार क्विंटल मिरची आवक
२०१९-२० च्या हंगामात बाजारात एकूण १ लाख ६९ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती. या आवकमुळे २०२१ या वर्षात मार्चपर्यंत मिरची उद्योग सुरू राहील अशी अपेक्षा होती. परंतु २०२० च्या नोव्हेंबरपर्यंत मिरची उत्पादनाला चुरडा-मुरडा सारख्या रोगाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. यातून नंदुरबार बाजारपेठेत कमी अधिक प्रमाणात मिरची आवक होत राहिली आहे. बाजारात आज घडीस पाच ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल दर देत शेतकऱ्यांकडून व्यापारी मिरची खरेदी करत आहेत. तूर्तास बाजारात दर दिवशी एक हजार क्विंटल मिरची आवक होत आहे. यातील बहुतांश मिरची ही गुजरात राज्यातील आहे. लाली व व्हीएनआर हे दोन वाण सध्या बाजारात अधिक प्रमाणात चालत असल्याचे दिसून आले आहे. यंदा मिरची आवक कमी झाल्याने दरांमध्ये वाढ असल्याने त्याचा परिणाम पूरक उद्योगातून उत्पादित केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर होणार असून तयार चटणीचे दर १० टक्के वाढतील असा अंदाज बाजारातून वर्तवला जात आहे.