70 रूग्णांना कृत्रिम अवयवांचे ‘चैतन्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:14 IST2018-08-05T15:13:56+5:302018-08-05T15:14:01+5:30
जयपूर फूट वितरण शिबिर : ‘लोकमत’ व साधू वासवानी मिशनचा उपक्रम

70 रूग्णांना कृत्रिम अवयवांचे ‘चैतन्य’
नंदुरबार : ‘लोकमत’ आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने तसेच नंदुरबार डिस्ट्रीक्ट मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या सहकार्याने 70 दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आल़े यावेळी त्यांच्या चेह:यावर चैतन्य पसरले होत़े
शनिवारी लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला़ नंदुरबारसह धुळे आणि जळगाव येथील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होत़े विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असलेल्या ‘लोकमत’ आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्यावतीने आजवर राज्यातील साडेतीन हजार रुग्णांना कृत्रिम हात- पायाचे (जयपूर फूट) वितरण करण्यात आले आह़े गेल्या दीड महिन्यापूर्वी साधू वासवानी मिशनच्या तज्ज्ञांनी शिबिराद्वारे अपघातात हात-पाय गमावलेल्या रुग्णांची तपासणी केली होती़ यातून त्यांच्या पाय आणि हातांची मापे घेण्यात आली होती़
कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रमात सुरुवातील साधू वासवानी मिशनचे मिलिंद जाधव, सुशील ढगे, डॉ़ सलील जैन, संजय जाधव, जितेंद्र राठोड, ज्ञानेश्वर पाटील, संजय शर्मा यांचे स्वागत नंदुरबार डिस्ट्रीक्ट मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी रुग्णांच्यावतीने दीपक पवार या युवकाने कृत्रिम अवयावामुळे आजींमध्ये हिंमत निर्माण झाल्याची भावना मनोगतात व्यक्त केली़ यशस्वीतेसाठी सुदाम राजपूत, बिपीन पाटील आदींनी परिश्रम घेतल़े