दोन कारवाईंमध्ये ६६ लाखांची दारू पथकाकडून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 13:05 IST2020-12-29T13:05:31+5:302020-12-29T13:05:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : अक्कलकुवा तालुक्यातील खापर ते मोरंबा आणि अक्कलकुवा ते खापर या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क ...

दोन कारवाईंमध्ये ६६ लाखांची दारू पथकाकडून जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : अक्कलकुवा तालुक्यातील खापर ते मोरंबा आणि अक्कलकुवा ते खापर या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीन वाहनांवर कारवाई करत विदेशी मद्यासह तीन वाहने जप्त केली.
एकूण ६६ लाख रूपयांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला आहे. खापर ते मोरंबा रस्त्यावर जीजे ०६ सीएम ५४०७ या वाहनाची तपासणी पथकाकडून करण्यात आली होती. त्यात परराज्यातील विक्रीसाठी नेण्यात येणारे एकूण २० विदेशी मद्याचे बाॅक्स मिळून आले. याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेत मद्य व वाहन असा ६ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान अक्कलकुवा ते खापर मार्गावर डीएन ०९ एम ९२९४ व एमएच ०४ एफपी ३१३६ या कंटेनरची पथकाने तपासणी केली असता त्यात मद्याचा ६० लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पथकाने केलेल्या या धडक कारवाईत एकूण ६६ लाख ४८हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलेअसून त्यांना न्यायालयात हजर केले असता, ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक युवराज राठोड मार्गदर्शनात पथकाने केली.