कोळदे येथे 65 वर्षीय विवाहितेचा पतीकडून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:55 IST2018-03-07T12:55:40+5:302018-03-07T12:55:40+5:30

65 year old married husband in Kolade harassed by his husband | कोळदे येथे 65 वर्षीय विवाहितेचा पतीकडून छळ

कोळदे येथे 65 वर्षीय विवाहितेचा पतीकडून छळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील कोळदे येथे 72 वर्षीय पतीकडून छळ होत असल्याची फिर्याद 65 वर्षीय पत्नीने तालुका पोलीस ठाण्यात दिली आह़े सहा महिन्यांपासून हा छळ होत असल्याचे पिडित महिलेचे म्हणणे आह़े   
रंजनाबाई रामदास पाटील (65) यांनी माहेरून कर्ज फेडण्यासाठी पैसे आणावेत यासाठी पती रामदास बंधू पाटील व नणंदेची मुलगी छायाबाई विठ्ठल पाटील हे दोघेही वेळावेळी शारिरिक व मानसिक छळ करत होत़े  म्हातारपणात होणा:या छळाला कंटाळून महिलेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे अर्ज देत दाद मागितली होती़ यावरून सोमवारी सायंकाळी रामदास पाटील व त्यांची भाची छायाबाई पाटील या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या प्रकाराने कोळदे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आह़े 
रंजनाबाई ह्या रामदास बंधु पाटील यांच्या तिस:या पत्नी आहेत़ यापूर्वी रामदास पाटील यांचे दोन विवाह झाले होत़े रंजनाबाई यांच्यापासून त्यांना एका मुलगा आह़े यातून वाद होत असल्याने महिलेचा छळ झाल्याचे सांगण्यात येत आह़े 

Web Title: 65 year old married husband in Kolade harassed by his husband