रानभाजी महोत्सवात ६३ रानभाज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:17 IST2020-10-13T13:17:04+5:302020-10-13T13:17:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुड्याच्या वनराईतील कंजाला येथे झालेल्या रानभाजी महोत्सवात ६३ प्रकारच्या रानभाजींसह विविध प्रकारच्या रानभाजीपासून बनविलेल्या ...

63 legumes in the legume festival | रानभाजी महोत्सवात ६३ रानभाज्या

रानभाजी महोत्सवात ६३ रानभाज्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सातपुड्याच्या वनराईतील कंजाला येथे झालेल्या रानभाजी महोत्सवात ६३ प्रकारच्या रानभाजींसह विविध प्रकारच्या रानभाजीपासून बनविलेल्या    पदार्थांची मांडणी करीत परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. यात उपस्थित मान्यवरांनी रानभाजी पदार्थांची माहिती घेत रानभाजीपासून बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
सातपुड्याच्या वनराईतील कंजाला येथे राष्ट्रीय पोषण माहनिमित्ताने एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळव्दारा जैविक विविधता व्यवस्थापन समिती कंजाला, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी, पळासखोब्रा यांनी आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवात परिसरातील महिलांनी वनराईतील ६३ प्रकारच्या वनभाजींसह  सहभाग घेतला. त्यात आंबाडीच्या पानाचे लोणचे, कंजाला शेतकरी मंडळाने तयार केलेली भगर, मातीच्या भांडीसह विविध पौष्टिक आहारापासून बनविलेल्या पाककृती, डनेलच्या अंगणवाडी सेविका कांताबाई वसावे यांनी मक्याच्या दुधापासून बनविलेली बर्फी या रानभाजी महोत्सवात माांडणी करण्यात आली होती.
या  कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंदाचे राजेंद्र दहातोडे, सरपंच भिमसिंग वळवी, माजी सभापती रूषाबाई वळवी याच्या हस्ते    याहामोगी मातेच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले होते. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी, महिला बालविकास विभागाच्या विस्तार अधिकारी सुजाता पाटील, मोलगी मंडळचे खैरनार, विषय विशेष तज्ञ राजेश भावसार, बालविकास अधिकारी अभिजित मौलानी, पर्यवेक्षीका वळवी, वंदना पाटील उपस्थित होते. 
प्रास्ताविक रामसिंग दुधल्या वळवी यांनी तर सूत्रसंचालन मनोहर पाडवी यांनी केले. तालुका कृषी विभागातर्फे रानभाजी महोत्सवात सहभागी महिलांना लिंबूची रोपे वाटप करण्यात आले.

सहभागी महिलांचा गौरव
या महोत्सवात परिसरातील बामणी, भगदरी, डनेल, माडंवा, डेब्रामाळ, पळासखोब्रा, वेलखेडी, सांबर, कंजाला या परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात कुकडीपादर, सरी, कंजाला, डेब्रामाळ, पळासखोब्रा, सांबर, वेलखेडी, बालाघाट या गावातील ४५ महिलांनी सहभाग घेतला होता. त्यात जमनाबाई बाज्या वळवी, लोगांबाई राजेंद्र वळवी (वेलखेडी), राहलीबाई जहागीर वळवी (डेब्रामाळ), सुनीताबाई सुनिल वळवी, रूषाबाई वळवी यांची निवड झाल्याने त्यांचा या वेळी गौरव करण्यात आला 
परसबागमध्ये सहभागी होऊन चांगल्याप्रकारे परसबाग केलेल्या सावित्रीबाई किरसिग वळवी (कंजाला), जिजाबाई अमरसिग वळवी (वेलखेडी), रोमाबाई बटेसिंग वळवी (सांबर), अनिताबाई सरदार वळवी (पळासखोब्रा) व २०१४ पासून पेचरा वळवी सतत रानभाजी तयार करीत असतात. परसबाग तयार करुन शेवग्याच्या शेंगापासून तयार केलेल्या सूप व पाककृती तयार करीत असल्याने त्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला.

Web Title: 63 legumes in the legume festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.