नंदुरबार व नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी चार वाजेर्पयत 60 टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:53 IST2017-12-13T17:53:00+5:302017-12-13T17:53:09+5:30

नंदुरबार व नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी चार वाजेर्पयत 60 टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथील नगरपालिका मतदानासाठी दुपारनंतर मोठय़ा संख्येने मतदारांनी हजेरी लावली होती़ दुपारी चार वाजेर्पयत अनुक्रमे 59.60 व 55 टक्के मतदान झाल़े दुपारी 2 वाजेनंतर मतदारांची गर्दी दिसून आली़ तत्पुर्वी 12 ते 2 वाजेदरम्यान मतदान काहीसे थंडावले होत़े मात्र दुपारनंतर मतदारांच्या उत्साहात वाढ झाली होती़ दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून मतदानाच्या स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला़ मतदान केंद्राच्या शंभर मीटर्पयतच्या परिसरात जमावाला उभे राहण्यास तसेच वाहन लावण्यास मनाई करण्यात येत आह़े
चार वाजेनंतर अनेक मतदान केंद्रावर रांगा होत्या़ शिवाय पक्ष पदाधिकारी व कार्यकत्र्याचीदेखील गर्दी वाढल्याने पोलिसांना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसरत करावी लागली़ काही ठिकाणी किरकोळ वादविवाद झाल़े दरम्यान, नंदुरबार शहराच्या चौकांमध्ये नागरिकांकडून राजकीय चर्चा रंगताना दिसून येत होत्या़ अत्यंत चुरशीच्या नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार या विषयांवर चर्चाना उधाण आले होत़े शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आलेला आह़े