धडगावनजीक ५६ हजारांचा गांजा जप्त, शिरपूरच्या एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST2021-02-18T04:59:12+5:302021-02-18T04:59:12+5:30
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील बेवडदा फाट्यानजीक ५६ हजारांचा आठ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. मंगळवार, १६ फेब्रुवारी रोजी ही ...

धडगावनजीक ५६ हजारांचा गांजा जप्त, शिरपूरच्या एकाला अटक
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील बेवडदा फाट्यानजीक ५६ हजारांचा आठ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. मंगळवार, १६ फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गधडदेव (ता. शिरपूर) येथील एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील बेवडदाकडे एकजण गांजा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी पाळत ठेवली असता, शिवदास वीरसिंग पावरा (रा. गधडदेव, ता. शिरपूर) हा आपल्या दुचाकी (एमपी ४६ एमबी १९४१)वरून संशयास्पदरित्या जात होता. त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५६ हजार ८६८ रुपयांचा ८ किलो गांजा सापडला. पोलिसांनी गांजा व ३० हजारांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. याविषयी हवालदार संजय मनोरे यांनी फिर्याद दिल्यानंतर शिवदास पावरा याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे करत आहेत.