तळोद्यातील यात्रेत मसाला खरेदी-विक्रीतून ५० लाखांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:04 IST2019-05-14T12:04:48+5:302019-05-14T12:04:57+5:30
तळोदा : तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मसालाबाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे़ मसाल्यांच्या खरेदी-विक्रीतून आतापर्यंत जवळपास ५० ...

तळोद्यातील यात्रेत मसाला खरेदी-विक्रीतून ५० लाखांची उलाढाल
तळोदा : तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मसालाबाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे़ मसाल्यांच्या खरेदी-विक्रीतून आतापर्यंत जवळपास ५० लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती आहे़
तळोदा येथील यात्रेत्सवातील मसाला बाजार प्रसिध्द आहे़ आजच्या काळात मसाले तिखट, धने, जिरे, हळद व इतर वस्तू रेडीमेट व आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत़ विविध कंपन्या या क्षेत्रात आजच्या काळात बाजारात उतरलेल्या आहेत़ परंतु येथील यात्रेत वर्षाला लागणारा मसाला आवडीप्रमाणे व आवश्यकतेनुसार विकत घेऊन दळून घेण्याची पध्दत अनेक वर्षांपासून सुरु आहे़ आजही गृहिणी येथील मसाल्यांनाच अधिक पसंती देत असतात़ या यात्रेत मसाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली दहाहून अधिक दुकाने लावली आहेत़ प्रत्येक व्यावसायिक साधारणत: यात्रेत पाच ते सहा लाख रुपयांची उलाढाल करीत असतो़ यात्रेत एकंदरीत ५० लाखांपर्यंत उलाढाल झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे़ सध्या सुरु असलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यामुळे मसाल्याच्या भावात काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे़ दरम्यान, महिलांकडून खडा मसाला, खोबरे, तिखट मिरची, हळद आदींना चांगली मागणी आहे़ लोणच्याचा तयार मसालाही गृहिणी यात्रेत खरेदी करणे पसंत करतात़ सर्व मिश्र मसाला १५० ते २०० रुपये किलो, हळद १२० ते १६० रुपये किलो, जिरे २२० ते २४० रुपये किलो, धने १२० ते १६० रुपये किलो, खोबरे २२० ते २४० रुपये किलो, लाल मिरची तिखट १४० ते १६० रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती येथील मसाल्याचे व्यापारी हाजी जाकीर हाजी गनी, हाजी शाकीर हाजी गनी या व्यापारी बंधुंकडून देण्यात आली़
बैलबाजार तेजीत
दरम्यान, यात्रेनिमित्त भरविण्यात येणाºया बैल बाजारातही आतापर्यंत १ कोटी २१ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे़ यात्रोत्सवानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कृषी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते़ दरवर्षाप्रमाणे याही वर्षी बैलबाजारात खरेदी-विक्री जोमात होती़ दरम्यान, बैल बाजारात या वर्षी विक्रीसाठी १ हजार २०० बैल आले होते़ त्यातून ९८० बैलांची विक्री करण्यात आली़ त्या बैैलबाजारात महाराष्ट्राबरोबरच शेजारील गुजरात, मध्यप्रदेश राज्यातूनही आलेल्या बैलांची मोठ्या संख्येने खरेदी-विक्री झाली होती़ दरम्यान, आपल्या पशुधनाला घेऊन आलेल्या पशुपालकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सर्व सोयीसुविधा करण्यात आल्या होत्या़