49 बालकांवर हृदयविकाराच्या होणार मोफत शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:32 IST2019-11-17T14:32:04+5:302019-11-17T14:32:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात आवश्यक असलेल्या 49 बालकांवर मुंबईत ...

49 बालकांवर हृदयविकाराच्या होणार मोफत शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात आवश्यक असलेल्या 49 बालकांवर मुंबईत टप्प्याटप्प्याने हृदयविकाराच्या मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. पी.के. अण्णा फाऊंडेशन व विविध शहर ग्राम गुजर मंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
पी.के. अण्णा फाऊंडेशन व व्हीएसजीजीएमतर्फे दरवर्षी शहादा येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येते. त्यात आवश्यक असणा:या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. यावर्षीही तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत 9 ऑक्टोबर 2019 रोजी बालरुग्णांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात तपासणीनंतर 49 बालरुग्णांवर हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे तपासणीत आढळून आले.
ठाणे येथील ज्युपीटर हॉस्पिटलने या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड केली होती. त्यानुसार 49 पैकी पहिल्या 10 बालरुग्णांना शस्त्रक्रियेसाठी 18 नोव्हेंबरला मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. या बालरुग्णांना मुंबई येथे पाठविण्यासाठी पी.के. अण्णा फाऊंडेशनतर्फे सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर मुंबईहून परत आणण्यासाठीही व्यवस्था या फाऊंडेशनने केली आहे. या रुग्णांना शुभेच्छा देण्यासाठी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व मकरंद पाटील हे उपस्थित राहणार आहेत. शहादा येथून सोमवारी सायंकाळी सहा वाजता हे बालरुग्ण मुंबई येथे रवाना होणार आहेत.
ज्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. एका रुग्णावर शस्त्रक्रियेसाठी किमान तीन ते चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या रुग्णांवर आता मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांनी फाऊंडेशन व मंडळाचे आभार मानले आहेत.