पुण्यातील ४८० मजूर रात्री नंदुरबारात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:25 IST2020-05-05T12:25:35+5:302020-05-05T12:25:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पुणे येथून ४८० व्यक्तींना परत आणण्यात येत असून, त्यापैकी जिल्ह्यातील ४०९ मजूर नंदुरबारकडे १७ ...

पुण्यातील ४८० मजूर रात्री नंदुरबारात येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पुणे येथून ४८० व्यक्तींना परत आणण्यात येत असून, त्यापैकी जिल्ह्यातील ४०९ मजूर नंदुरबारकडे १७ बसेसद्वारे येत आहेत. त्यात नंदुरबार ४५, नवापूर १५, शहादा ८८, तळोदा ३२, धडगाव १२० तर अक्कलकुवा तालुक्यातील १०९ व्यक्तींचा समावेश आहे.
सध्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीत स्थलांतरीत मजूरवर्ग राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेला असून, या कालावधीत रोजगार नसल्याने त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी व स्थलांतरित ठिकाणाहून मूळगावी येण्यासाठी पैसे उपलब्ध नाही. अशा आपत्तीच्या कालावधीत मजुरांना मूळ गावी परतण्यासाठी आदिवासी विकास विभागाने १७ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेस संपूर्ण सॅनिटायझर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये १२ मजूर बसविण्यात आले आहेत. प्रवासा दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. प्रवासा दरम्यान भोजनाची सोयही आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येत आहे. सर्व ४०९ मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांना जिल्ह्यात आल्यावर होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. त्या सर्व मजुरांना जिल्हा क्रिडा संकुल नंदुरबार येथे आणण्यात येणार आहे.