पेटीएमद्वारे एकाची 45 हजारात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:18 IST2019-11-24T12:18:51+5:302019-11-24T12:18:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पेटीएमवर आलेली कॅशबॅकची लिंक बँक अधिकारी असल्याचे भासवून आपल्या मोबाईलवर घेत एकाची 45 हजारात ...

पेटीएमद्वारे एकाची 45 हजारात फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पेटीएमवर आलेली कॅशबॅकची लिंक बँक अधिकारी असल्याचे भासवून आपल्या मोबाईलवर घेत एकाची 45 हजारात फसवणूक केल्याची घटना 21 रोजी ब्राम्हणपूरी येथे घडली.
ब्राम्हणपुरी येथे राहणारा विद्यार्थी विकास कैलास जाधव याने पेटीएमद्वारे व्यवहार केला होता. त्याला कॅशबॅक आले होते. त्यासाठीची लिंक देखील त्याच्या मोबाईलवर आली होती. एकाने आपण बँक अधिकारी असल्याचे भासवून ती लिंक पाठविण्याचे सांगितले. जाधव यांनी संबधीत व्यक्तीच्या मोबाईलवर लिंक पाठविताच काही वेळात त्यांच्या खात्यातील 45 हजार रुपये काढून घेण्यात आले.
आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर विकास जाधव याने शहादा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार सैय्यद करीत आहे.