वृद्धाच्या बँंक खात्यातून ‘अज्ञात ठगा’ने ४४ हजार परस्पर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:33 IST2019-05-04T12:33:18+5:302019-05-04T12:33:42+5:30

सायबर गुन्हा : म्हसावद येथील व्यापाऱ्याची फसवणूक

44 thousand interactions with the 'unknown cheat' from the bank's bank account | वृद्धाच्या बँंक खात्यातून ‘अज्ञात ठगा’ने ४४ हजार परस्पर काढले

वृद्धाच्या बँंक खात्यातून ‘अज्ञात ठगा’ने ४४ हजार परस्पर काढले

नंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे वृद्धाच्या बँक खात्यातून परस्पर ४४ हजार रुपये काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे़ ७२ वर्षीय वृद्धास थेट बँकेचा मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ म्हसावद परिसरात ही सलग दुसरी फसवणूकीची घटना आहे़
म्हसावद येथील केसरीमल बाबुलाल बेदमुथा यांना ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता शहादा येथील स्टेट बँकेच्या खात्यातून पैसे काढले गेल्याची माहिती मोबाईलवर मेसेजद्वारे मिळाली होती़ त्यांनी याबाबत बँकेंत संपर्क केला असता, गोंदिया येथील दिपक आॅटो मोबाईल या नावाने ४४ हजार ४०० रुपये वर्ग करण्यात आल्याचे समजून आले़ बँकेने दिलेल्या माहितीनंतर बेदमुथा यांनी तात्काळ म्हसावद पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली आहे़ हा प्रकार आॅनलाईन ठगाकडून करण्यात आल्याची माहिती असून अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान शहादा तालुक्यातील रायखेड येथील तनवीर शहाबुद्दीन कुरेशी यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन बँक खाते व एटीएम पीन विचारला होता़ यातून २७ एप्रिल रोजी त्यांच्या बँक खात्यातून सायंकाळी ९० हजार २०० रुपये अज्ञात व्यक्तीने परस्पर काढून घेतले होते़ याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ शहादा तालुक्यासह मध्यप्रदेश सिमेलगतच्या गावांमध्ये बँक अधिकारी असल्याची बतावणी करत दरदिवशी अनेकांच्या मोबाईलवर अज्ञात ठग संपर्क करत असल्याची माहिती समोर आली आहे़ इंग्रजी किंवा हिंदीत बोलून बँक खात्याची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे़ यातून परस्पर पैसे काढले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत़ ग्रामीण भागातील नागरिक ठगांच्या भूलथापांना बळी पडत असल्याने पोलीस दलाकडून याबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़

Web Title: 44 thousand interactions with the 'unknown cheat' from the bank's bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.