जिल्ह्यातील 436 विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:44 IST2019-06-20T12:44:33+5:302019-06-20T12:44:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक ...

436 students' scholarships in the district | जिल्ह्यातील 436 विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती

जिल्ह्यातील 436 विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल जाहिर करण्यात आले आहेत़ यात जिल्ह्यात दोन्ही गटातील 436 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत़ 
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाचवीच्या वर्गातील एकूण 5 हजार 454 विद्याथ्र्यानी परीक्षेसाठी नोंदणी केली होती़ यात 5 हजार 202 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली होती़ यातील 968 विद्यार्थी पात्र तर तर 4 हजार 234 विद्यार्थी अपात्र ठरल़े पाचवीच्या गटातील 223 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत़ 
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या आठवीच्या गटातून जिल्ह्यातील 4 हजार 263 विद्याथ्र्यानी नोंदणी केली होती़ प्रत्यक्ष परीक्षेसाठी 4 हजार 107 विद्यार्थी हजर तर 156 गैरहजर होत़े परीक्षेत 366 विद्यार्थी पात्र तर 3 हजार 741 विद्यार्थी अपात्र आहेत़ 213 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत़ पाचवीच्या गटाची पात्रतेची टक्केवारी 18 तर माध्यमिक गटातून केवळ आठ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत़ राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील एकाही विद्याथ्र्याचा समावेश नसल्याची माहिती आह़े 
 

Web Title: 436 students' scholarships in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.