प्रकाशा येथे ४० बेडचे विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST2021-04-12T04:27:46+5:302021-04-12T04:27:46+5:30

प्रकाशा येथील सद्‌गुरू धर्मशाळेत पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी, जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारूड, जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री ॲड.पद्‌माकर ...

40 bed separation room at Prakasha | प्रकाशा येथे ४० बेडचे विलगीकरण कक्ष

प्रकाशा येथे ४० बेडचे विलगीकरण कक्ष

प्रकाशा येथील सद्‌गुरू धर्मशाळेत पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी, जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारूड, जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री ॲड.पद्‌माकर वळवी, डॉ.प्रांताधिकारी डाॅ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मराज चौधरी, प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ.विवेक बावस्कर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत धर्मशाळेतील २० खोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यात २० बेड पुरुष व २० बेड महिलांसाठी असणार आहेत. एका खोलीत दोन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. असे एकूण ४० बेडची व्यवस्था सद्‌गुरू धर्मशाळा, महसूल विभाग व प्रकाशा ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.

दरम्यान, गरज पडल्यास सद्‌गुरू धर्मशाळेचा वरचा व खालच्या हॉलसह व इतर खोल्यांमध्येही बेडची सुविधा उपलब्ध करून सुमारे १०० बेडची सुविधा या ठिकाणी होईल. जिल्ह्यातून उपलब्धतेनुसार डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक यांची संख्या वाढल्यानंतर बेडची संख्या वाढवणार असल्याचे समजते.

Web Title: 40 bed separation room at Prakasha