लॉकडाऊनच्या काळात दुकानात ३९ हजाराची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:10 IST2020-05-07T12:10:12+5:302020-05-07T12:10:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीची काच फोडून ३९ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना ...

39,000 stolen from shop during lockdown | लॉकडाऊनच्या काळात दुकानात ३९ हजाराची चोरी

लॉकडाऊनच्या काळात दुकानात ३९ हजाराची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीची काच फोडून ३९ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना नंदुरबारातील डीएसके मार्केटमध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसस्थानकासमोरील डीएसके मार्केटमध्ये नाकोडा दुकान आहे. दुकानात शालेय व खेळाचे साहित्य विक्री केले जाते. लॉकडाऊनच्या काळात अर्थात २१ मार्च ते ५ मे दरम्यान या दुकानाच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
दुकानातील पेन्सील, फूटबॉल व सेल असे एकुण ३९ हजार १०० रुपयांचे साहित्य चोरून नेले. ५ मे रोजी दुकानमालक विनोद जुगराज बाफना हे दुकान उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत विनोद बाफना यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पवार करीत आहे.

Web Title: 39,000 stolen from shop during lockdown