मोड पुनर्वसन वसाहतीतील 35 मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:10 IST2019-06-17T12:10:41+5:302019-06-17T12:10:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेतातून मजुरी करून पुन्हा आपल्या वसाहतीत टेम्पोमधून जात असताना मध्येच चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो ...

मोड पुनर्वसन वसाहतीतील 35 मजूर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शेतातून मजुरी करून पुन्हा आपल्या वसाहतीत टेम्पोमधून जात असताना मध्येच चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात मोड पुनर्वसन वसाहतीतील 35 बाधीत जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील नऊ जणांना जास्त मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी कढेल फाटय़ानजीक घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सरदार सरोवर प्रकल्पबाधीत झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील बुडीत गावातील कुटुंबाचे पुनर्वसन मोड गावाजवळील वसाहतीत करण्यात आले आहे. या वसाहतधारकांना चौगाव शिवारात शासनाने जमीन दिलेली आहे. यातील 35 विस्थापित हे रविवारी आपल्या स्वत:च्या व दुस:याच्या शेतात पिकाची निंदणी करण्यासाठी गेले होते. मजुरी करून दुपारी टेम्पोने (क्रमांक एम.एच.15 डीके- 510) पुन्हा आपल्या वसाहतीकडे जात असताना कढेल-मोड दरम्यान चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. या टेम्पोत 35 जण बसले होते. ते सर्व जखमी झाले. रस्त्यावरून येणा:या-जाणा:यांनी जखमींना उचलून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या जखमींपैकी नऊ जणांना डोक्याला व हातापायांना जास्त मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची घटना पुनर्वसन वसाहतीत कळविण्यात आल्यानंतर त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघाताबाबत निता भायजी वसावे (रा.मोड पुनर्वसन वसाहत) यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून टेम्पो चालक कोमलसिंग गोरखसिंग राजपूत (रा.कढेल) याच्याविरोधात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ.विलास पवार करीत आहेत.
अपघातात जखमी झालेल्यांची नावे अशी : सौदीबाई भिमा वसावे, सुनीता भयजी वसावे, मिराबाई उग्रावण्या वसावे, रंगीता रमेश वसावे, रेखा वाडय़ा वसावे, दिनेश रमेश वसावे, माणिक गाम्या वसावे, सागर बामण्या वसावे, लक्ष्मण सिंगा वसावे, गणेश बोद्या वसावे, जेहराबाई रवी वसावे, टिडबीबाई रणजी वसावे, प्रियंका रणजी वसावे, गिरणाबाई सोना वळवी, राकेश सोना वळवी, कुंता वन्या वसावे, शविला वन्या वसावे, बुरकी ओम:या वसावे, सायका बोसा वसावे, पार्वती सोना वळवी, हिरा मांगजी वसावे, किसन मोकन्या वसावे, जेसाबाई ठोगा वसावे, शांतीबाई पुन्या वसावे, येमना रामा वसावे, सुनीता दिवाल्या वसावे यांचा समावेश आहे.