तळोदा तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती ठरल्या कोरोनाबळी मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST2021-06-03T04:22:08+5:302021-06-03T04:22:08+5:30
तालुक्यातील अंमलपाडा, अमोनी, रापापूर, धवळीविहिर, कोठार, चाैगाव खुर्द, खर्डी बुद्रुक, भवर, चाैगाव बुद्रुक, दसवड, धानोरा, धनपूर, सिलींगपूर, खर्डी खुर्द, ...

तळोदा तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती ठरल्या कोरोनाबळी मुक्त
तालुक्यातील अंमलपाडा, अमोनी, रापापूर, धवळीविहिर, कोठार, चाैगाव खुर्द, खर्डी बुद्रुक, भवर, चाैगाव बुद्रुक, दसवड, धानोरा, धनपूर, सिलींगपूर, खर्डी खुर्द, सावरपाडा, अलवान, इच्छागव्हाण, कढेल, करडे, काशीपूर, गंगानगर, रोझवे पुनवर्सन, लाखापूर (फॉरेस्ट) नवागाव, न्यूबन, पाडळपूर, रेवानगर, जीवननगर, गोपाळपूर, सरदारनगर, तऱ्हावद, तुळाजा, रोझवे, वाल्हेरी या गावांमध्ये दुसऱ्या लाटेत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.
दरम्यान, दुसरीकडे रामपूर, रतनपाडा, आमलाड, भवर, बोरद, बुधावल, छोटा धनपूर, चिनोदा, दलेलपूर, खरवड, खेडले, खुशगव्हाण, बेलीपाडा, लोभाणी, मालदा, मोड, मोदलपाडा, मोहिदा, मोरवड, नळगव्हाण, पिंपरपाडा, प्रतापपूर, राजविहिर, राणापूर, राणीपूर, बंधारा, रांझणी, सलसाडी, शिर्वे, सोमावल खुर्द, सोमावल बुद्रुक, तळवे, गंगानगर, झिरी या ग्रामपंचायतींतर्गत ११९ जणांचा मृत्यू झाला आहे. यातही बोरद ग्रामपंचायतींतर्गत १२, मोड १० तर प्रतापपूर येथे १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, तालुक्यातील मृत्यूची संख्या गेल्या चार दिवसात कमी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी कोविड नियमावलीचे पालन करावे असे गटविकास अधिकारी आर.बी.सोनवणे यांनी सांगितले.