३२ मन सुवर्ण सिंहासन खडा पहारासाठी तरुणांनी पुढे यावे : पू.संभाजीराव भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:31 AM2021-03-05T04:31:40+5:302021-03-05T04:31:40+5:30

पू. संभाजीराव भिडे गुरुजी नंदुरबार येथील सदिच्छा भेटीत मोजक्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. बैठकीत त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांना कशा ...

32 minds should come forward to guard the golden throne: Pu. Sambhajirao Bhide Guruji's statement | ३२ मन सुवर्ण सिंहासन खडा पहारासाठी तरुणांनी पुढे यावे : पू.संभाजीराव भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

३२ मन सुवर्ण सिंहासन खडा पहारासाठी तरुणांनी पुढे यावे : पू.संभाजीराव भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

googlenewsNext

पू. संभाजीराव भिडे गुरुजी नंदुरबार येथील सदिच्छा भेटीत मोजक्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. बैठकीत त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांना कशा क्रूर पद्धतीने हालहाल करून मृत्युमुखी पाडले याचे वर्णन सांगून बलिदान मास प्रत्येक घराघरांत साजरा झाला पाहिजे, त्याचप्रमाणे रायगडावर निर्माण होणाऱ्या ३२ मन सुवर्ण सिंहासन यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ४ हजार शिवभक्त धारकरी यांची नोंदणी करा, असे मार्गदर्शन धारकरींना केले. यावेळी भिडे गुरुजी यांनी अरिहंत गौशाळा याठिकाणी सदिच्छा भेट दिली. गौशाळेचे व्यवस्थापन बघून त्यांनी सर्व गौभक्त यांचे कौतुक केले आणि महाराष्ट्र शासन ज्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजना राबवते त्याप्रमाणे गौमातेसाठी ही अनुदान योजना महाराष्ट्र शासनाने राबवावी, यासाठी मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धनमंत्री यांच्या बोलणार असल्याचे गौसेवक यांना सांगितले. यावेळी ते हिंदू सेवा साहाय्य समितीच्या कार्यालय तसेच डॉ. नरेंद्र पाटील यांचा घरी सदिच्छा भेट दिली असता हिंदू सेवा साहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, मयूर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी, कपिल चौधरी, पंकज डाबी यांनी पू. भिडे गुरुजी यांना राजे शिवछत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा सत्य इतिहास व्याख्यानाचा माध्यमातून नंदुरबारकरांना सांगावा, यासाठी लेखी निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारून लवकरच तारीख कळवणार असल्याचे कळवले. या सदिच्छा भेटीत त्यांनी धारकरी यांच्याशी सध्याची स्थानिक स्थिती जाणून घेतली.

Web Title: 32 minds should come forward to guard the golden throne: Pu. Sambhajirao Bhide Guruji's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.