दोन ट्रकांमधून जाणारे 32 गायी व 12 वासरू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:04 IST2019-06-14T12:04:07+5:302019-06-14T12:04:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन ट्रकांमधून तब्बल 32 गायी व 12 वासरू वाहून नेणा:या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

दोन ट्रकांमधून जाणारे 32 गायी व 12 वासरू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन ट्रकांमधून तब्बल 32 गायी व 12 वासरू वाहून नेणा:या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकुण 11 लाख 34 हजार रुपयांचे दोन ट्रक व पशुधन जप्त केले.
शहादाकडून नंदुरबारकडे अवैधरित्या पशुधन येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पाटोंदा शिवारात सापळा लावला. संशयीत दोन ट्रका (क्रमांक जीजे 6 एव्ही 2625 व एमएच 18-एए 8622) थांबविल्या असता त्यात एका ट्रकमध्ये 17 तर दुस:या ट्रकमध्ये 15गायी व वासरू निर्दयीपणे कोंबण्यात आले होते. याबाबत ट्रक चालकांना पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सर्व पशुधन पोलिसांनी जप्त केले.
याबाबत पोलीस नाईक राजधन जगदाळे यांनी फिर्याद दिल्याने चालक शेख ईस्माईल शेख इब्राहिम, रा.कुरेशीवाडा, तळोदा. भरत हिरामण जागराणा, रा.महेशगाव, ता.म्हाडा, जि.सोलापूर, नाथाबाई मोतीबाई भरवाड, रा.गायत्रीनगर, वरोडदरा, सुरत. अजय कान्या पाटील रा.आंबोली, सुरत. गगती जागा भरवाड, रा.गुरसाळे, ता.म्हाडा, जि.सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास जमादार सुभाष ठाकरे करीत आहे. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, पशुधन कुठे जात होते याची मािहती पोलीस घेत आहेत.