कृषी विभागातर्फे ३०३ कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 12:38 IST2020-05-28T12:38:43+5:302020-05-28T12:38:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागातर्फे ३०३ कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एक कोटी रुपयांची ...

कृषी विभागातर्फे ३०३ कामांना मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागातर्फे ३०३ कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एक कोटी रुपयांची ही कामे आहेत.
याचाच एक भाग म्हणून जुनमोहिदे, ता.नंदुरबार येथे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते कंम्पार्टमेंट बंडींगच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यात गट क्रमांक एक मध्ये ४४ मजूर, गट क्रमांक तीन मध्ये ५२ मजूर व गट क्रमांक चार मध्ये २९ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली. या वेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नंदुरबार उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, मंडळ कृषी अधिकारी विजय मोहिते, कृषी सहाय्यक अरूण पाटील, सुधीर वाघमारे, सरपंच राजेंद्र पाटील, ग्रामसेवक ललिता गवते आदी उपस्थित होते.
कृषी विभागामार्फत विविध गावात सुमारे एक कोटी पाच लाख रूपयांची ३०३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, २६ कामे सुरू आहेत. यामध्ये फळबाग लागवड, गांडुळ युनिट, नॅडेप युनिट, कम्पार्टमेंट बडींग या कामाचा समावेश आहे. या कामातून सुमारे ४४ हजार २६० मनुष्य दिवस एवढी रोजगार निर्मिती होणार आहे. फळबाग लागवड या नियमित योजनेमध्ये जून-जुलै पर्यंत रोजगार निर्मित करण्यात येणार आहे. तसेच ज्या गावांमध्ये रोजगाराची आवश्यकता अशा गावात ग्रामपंचायतीमध्ये अथवा रोजगार सेवकांकडे मागणी नोंदविल्यास तत्काळ रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मग्रारोहयो अंतर्गत मजुरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मजुरांना केले आहे.
नंदुरबार येथील कृषी विभागातील कृषी सहाय्यक अरूण पाटील हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असतांनाही त्यांनी सुमारे १२५ मजुरांना महिनाभर पुरेल अशा कामांचे नियोजन केले असून, महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजुरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी गावात जनजागृती त्यांनी केली आहे.