डिझेल नसल्याने २० हजार ग्राहकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:18 IST2020-02-28T12:18:30+5:302020-02-28T12:18:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीत मोबाईल व लॅण्डलाईन फोनची सेवा सुरळीत राहावी यासाठी येथील दूरसंचार कार्यालयास ...

3,000 consumers suffer due to lack of diesel | डिझेल नसल्याने २० हजार ग्राहकांना त्रास

डिझेल नसल्याने २० हजार ग्राहकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीत मोबाईल व लॅण्डलाईन फोनची सेवा सुरळीत राहावी यासाठी येथील दूरसंचार कार्यालयास जनरेटर उपलब्ध करून दिले आहे. तथापि ते डिझेल अभावी अक्षरश: धुळखात पडले आहे. साहजिकच त्याचा परिणाम मोबाईल व इतर सेवांवर पडत असून, २० हजार ग्राहकांचे मोबाईल निरूपयोगी ठरत असल्याचे म्हटले जात आहे.
वाढत्या स्पर्धेत भारत दूरसंचार विभागाच्या उदासिन धोरणाबाबत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिझेलच्या इंधनाबाबत ठोस उपाययोजना हाती घ्याव्या, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे.
भारतीय दूरसंचार निगमाकडून तळोद्यासह अक्कलकुवा, खापर, मोलगी परिसरात आपली मोबाईल व दूरध्वनी सेवा उभारण्यात आली आहे. ही सेवा ग्राहकांना देण्यासाठी याठिकाणी साधारण १५ टॉवर उभारण्यात आली आहेत. जवळपास २० हजार ग्राहकांनी भारत दूरसंचारची लॅण्डलाईन व भ्रमणध्वनीची सेवा घेतली आहे. यात या परिसरातील सहकारी व राष्टÑीयकृत बँकांनी देखील सेवा घेतली आहे.
ग्राहकांबरोबरच सर्व संबंधित यंत्रणांना वीज भारनियमन अथवा खंडित वीजपुरवठा दरम्यान सुरळीत सेवा पुरविण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तळोदा यथील भारत दूरसंचार निगमच्या कार्यालयाला जनरेटर उपलब्ध करून दिले आहे. परंतु त्यासाठी लागणाºया डिझेल इंधनाअभावी हे जनरेटर गेल्या अनेक महिन्यांपासून धुळखात पडले आहे. परिणामी त्याचा मोठा परिणाम नेट कनेक्टीव्हीटीवर होत असून, सततच्या आऊट आॅफ कव्हरेजच्या उत्तरामुळे ग्राहक अक्षरश: वैतागले आहे.
वास्तविक भारनियमना दरम्यान मोबाईल टॉवरची बॅटरी चार्जिंगसाठी जनरेटरला इंधन उपलब्ध होणे करीता येथील कार्यालयाकडून निधीची मागणी केली जात असते. आताही कार्यालयाने वरिष्ठांकडे डिझेलची मागणी केली आहे. मात्र आजतागायत इंधन अथवा त्यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. आधीच इतर तांत्रिक अडचणींमुळे नेटवर्कचा सामना ग्राहकांना करावा लागत असतो. जेम तेम ते तांत्रिक अडचणी दूर होतात. त्यात पुन्हा भारनियमन व खंडित वीजपुरवठ्याचा व्यत्यय साहजिकच दूरसंचारच्या सेवेस ग्राहक कंटाळले असून, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या उदासिन भूमिकेबाबत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेषत: अनेक बँकांनी भारत दूरसंचार निगमच्या सेवेला जोडली आहेत आणि ज्या दिवशी वीजवितरण कंपनीतर्फे भारतनियमन केले जाते त्या दिवशी दिवसभर पुरवठाही खंडित केला जातो. तेव्हा भारत दूरसंचारची सेवादेखील बंद होते. त्यादिवशी बँकेचे व्यवहारदेखील बंद होत असतात. ज्या ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर आधार कार्ड, बँकखाते लिंक केला आहे. त्यामुळे त्यांची कामेच ठप्प होत असल्याचे ग्राहक सांगतात. विशेष म्हणजे ग्राहकांनी आपले व्हाऊचर रिचार्ज केल्यानंतर या सेवेचा पुरेपूर फायदा त्यांना मिळत नाही. नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याची व्यथा ग्राहकांनी बोलून दाखविली आहे.

तळोद्यासह अक्कलकुवा, खापर, मोलगीपर्यंतच्या परिसरातील मोबाईल व दूरध्वनीचे ग्राहक भारत दूरसंचारच्या सेवेने जोडली आहेत. या परिसरात साधारण २० हजारापेक्षा अधिक ग्राहक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु त्यांना सुविधा देण्यासाठी फक्त २० टॉवर उभारण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या ग्राहकांची संख्या पाहता टॉवर्सची संख्या कमी पडते. पुरेशा संख्येअभावी त्यांना नेटवर्कची रेंजदेखील पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे सातत्याने व्यत्यय येत असतो. वास्तविक आपल्या नेटवर्कला ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी खाजगी कंपन्या प्रयत्न करीत असतात. मात्र भारत दूसरंचार निगमकडे ग्राहकांची संख्या असून, ही त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. संबंधीत अधिकाºयांनी याप्रकरणी सुधारणा करून सुरळीत सेवा उपलब्ध करावी, अन्यथा भारत दूरसंचार निगमची सेवाच बंद करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.

Web Title: 3,000 consumers suffer due to lack of diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.