धडगाव उपविभागातील 3 हजार ग्राहकांची वीज कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:32 IST2019-09-18T12:32:02+5:302019-09-18T12:32:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलत विज वितरण कंपनीच्या शहादा विभागातील धडगाव उपविभागात 3 ...

3,000 consumers in Dhadgaon subdivision cut off electricity | धडगाव उपविभागातील 3 हजार ग्राहकांची वीज कापली

धडगाव उपविभागातील 3 हजार ग्राहकांची वीज कापली

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलत विज वितरण कंपनीच्या शहादा विभागातील धडगाव उपविभागात 3 हजार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आह़े यामुळे धडगाव शहरासह दुर्गम भागातील अनेक घरे गेल्या आठ दिवसांपासून अंधारात आहेत़      
धडगाव उपविभागातील घरगुती आणि व्यावसायिक वीज बिलांची वसुली गत सहा महिन्यांपासून झालेली नसल्याची माहिती आह़े कंपनीकडून थकबाकीदार ग्राहकांना वारंवार सूचना करुनही त्यांच्याकडून वीज बिलांचा भरणा होत नसल्याने अखेर गेल्या आठवडय़ापासून वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती़ यांतर्गत आतार्पयत 3 हजार 400 ग्राहकांची वीज कापली गेली आह़े यामुळे धडगाव शहर आणि परिसरातील गावांमध्ये गत आठ दिवसांपासून अंधार आह़े या प्रकारानंतरही बोटावर मोजण्याएवढय़ाच ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा केला आह़े येत्या काळात ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत वीज कंपनीकडून देण्यात आले आहेत़ या प्रकाराने थकबाकीदार ग्राहकांची भंबेरी उडाली असून वीज पूर्ववत करण्यासाठी त्यांच्याकडून बिलांचा भरणा सुरु झाल्याची माहिती आह़े 
वीज कंपनीच्या शहादा विभागाकडून सध्या  बिल नाही तर वीज नाही ही मोहिम सुरु करण्यात आली आह़े यांतर्गत शहादा, तळोदा, धडगाव  आणि  अक्कलकुवा याठिकाणी थकबाकीदार ग्राहकांना ताकीद देऊन बिल भरण्याबाबत सांगण्यात येत आह़े यानंतरही बिल भरणा:या ग्राहकांची वीज कापली जात आह़े  यांतर्गत  धडगाव उपविभागात 3 हजार 400 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला़ वीज कंपनीचे दिलीप पावरा, समाधान मानकर, सोमनाथ लोहार यांच्याकडून ही कारवाई करण्यात येत आह़े 
शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता किसन पावरा हे गत आठ दिवसांपासून धडगावात तळ ठोकून आहेत़ त्यांच्याकडून ग्राहकांना वीज बिल भरण्याबाबत समज दिली जात आह़े 

धडगाव उपविभागात एकूण 18 हजार  वीज ग्राहक आहेत़ तालुक्यात 59 लाख रुपयांची विद्युत बिले थकीत आहेत़  थकबाकीच्या वसुलीसाठी वीज कंपनीच्या कर्मचा:यांची सातत्याने फिरफिर होत आह़े नियमित वीज ग्राहकांना सुविधा देण्यात अडचणी येत आहेत़ यामुळे वीज यंत्रणेची देखभाल दुरूस्ती करणे, नव्या वीज जोडण्या, ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे शक्य होत नसल्याचे प्रकार होत आहेत़
दरम्यान धडगाव येथील उपकार्यकारी अभियंता  जगदिश पावरा यांनी आकडे टाकुन  विज चोरी करणा:या ग्राहकांवर कारवाई करुन घरोघरी मीटर तपासणी होणार असल्याचे सांगितले आह़े यात दोषी आढणा:यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी कळवले आह़े विज बिलांच्या संदर्भातील वसुली आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी धडगाव शहरात चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आह़े 

सध्या ज्या ग्राहकांची वीज कंपनीने खंडीत केली आह़े त्यांची आकस्मिकपणे फेरतपासणीही होणार आह़े यादरम्यान एखादा ग्राहक वीज चोरीत दोषी आढळल्यास किंवा शेजारील घरातून अनधिकृतपणे वीज घेत असल्यास त्याच्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याचा इशारा वीज कंपनीच्या अधिका:यांकडून देण्यात आला आह़े तालुक्यातील अनेक गावांचा थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याची वेळ प्रथमच येऊन ठेपल्याचे दिसून आले आह़े 
 

Web Title: 3,000 consumers in Dhadgaon subdivision cut off electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.