नवापूरला १३ डंपरमधून ३० टन वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:19 IST2020-06-12T12:17:52+5:302020-06-12T12:19:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीची बंदी असताना वाळू वाहतूक केल्या प्रकरणी पोलीस व महसूल प्रशासनाने ...

नवापूरला १३ डंपरमधून ३० टन वाळू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीची बंदी असताना वाळू वाहतूक केल्या प्रकरणी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करून १३ डंपर ताब्यात घेतले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू होते.
गुजरात राज्यातील हद्दीत तापी नदीपात्रात वाळूचे विविध घाट निर्माण करण्यात आले असुन तेथून वाळू उपसा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात व इतर ठिकाणी वाळू वाहतूक केली जाते. इतर राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळू वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाह्य मार्गांनी करावी असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश असल्याच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वेफाटकावर पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करून नाशिककडे जाणारी तीन व औरंगाबादकडे जाणारी दहा असे १३ डंपर ताब्यात घेतले़ ही वाळू वाहतूक नियमानुसार करण्यात येत आहे, सर्व प्रकारची रॉयल्टी भरल्याचे वाहतूक करणाऱ्या चालकांकडुन सांगितले जात होते.
जिल्हा सीमेलगतच्या राज्यातून इतर भागात वाळू वाहतूक सुरू झाल्यास व त्या भागात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाकडून असे जिल्हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. रेती किंवा वाळू वाहतूकीमुळे असलेले धोके पाहता प्रशासनाकडुन हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यात एमएच २२ एएन ३३६६, एमएच २१ एक्स ७८९९, एमएच १० सीआर १२६३, एमएच १८ एए ९०४४, एमएच २० इजी ३४७३, एमएच २० डीई ५६५०, एमएच २० ईएल ५३१३, एमएच २० ईएल ४३१३, एमएच २० डीई ६८३१, एमएच २१ बीएच ५७५८, एमएच १५ एसव्ही ७०९२, एमएच १५ ईएस ९२७९, एमएच १५ एचबी ७२९९ या वाहनांचा समावेश आहे़ सायंकाळी तहसील समोरील मैदानात ही वाहने आल्यानंतर तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस अधिकारी तेथे हजर झाली होती. उशिरापर्यंत वाहनांचा पंचनामा सुरु होता़