कोळदे आश्रमशाळेत ६० विद्यार्थी सिकलसेलने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:46 IST2020-02-01T12:46:00+5:302020-02-01T12:46:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोळदे येथील अनुदानित आश्रमशाळेत खोंडामळी ग्रामीण रुग्णालयाने २६ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ...

3 students disrupted by sickle at Coal Ashram | कोळदे आश्रमशाळेत ६० विद्यार्थी सिकलसेलने बाधित

कोळदे आश्रमशाळेत ६० विद्यार्थी सिकलसेलने बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील कोळदे येथील अनुदानित आश्रमशाळेत खोंडामळी ग्रामीण रुग्णालयाने २६ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली होती़ तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर येथील ६० विद्यार्थी सिकलसेलने तर १ विद्यार्थिनी थॅलसेमियाने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे़ या माहितीनंतर खोंडामळी ग्रामीण रुग्णालयाने तातडीने पावले उचलत विद्यार्थ्यांवर उपचार सुरु केले आहेत़
कोळदे येथील आश्रमशाळेत सुमारे ६५० विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर एकाच वेळी ६० विद्यार्थी सिकलसेलने बाधित असल्याचे समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे़ सिकलसेल हा अनुवाशिंक आजार असला तरी तो योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो़ परंतू बाहेर शिक्षण घेणारे विद्यार्थी काळजीने औषधी घेतली का, असा प्रश्न असल्याने समोर आलेल्या रुग्ण विद्यार्थ्यांना विशेष सुविधा देण्याची गरज निर्माण झाली आहे़ आरोग्य विभाग सिकलसेल निर्मुलनासाठी विशेष प्रयत्न करत असला तरी आता शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचीही जबाबदारी त्यांना घ्यावी लागणार आहे़ खोंडामळी ग्रामीण रुग्णालयाने दोन टप्प्यात केलेल्या तपासणीनंतर ७ ते १७ वयोगटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ह्या सिकलसेल ग्रस्त असल्याचे समोर आले होते़ त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून दर आठवड्याला नियमित समुपदेशक त्याठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी करुन माहिती देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्रारंभी ईलेक्ट्रोफोसिस चाचणी करुन त्याचा अहवाल मागण्यात आला होता़ यात ६० विद्यार्थी बाधित असल्याचे खोंडामळी ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाच्या निदर्शनास आले होते़ रुग्णालयाने तातडीने विद्यार्थ्यांसाठी फॉलिक अ‍ॅडीड टॅब्लेटचा डोस सुरु करत विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले आहे़ दरम्यान तपासणीदरम्यान १० वर्षीय बालिका थॅलेसिमियाने ग्रस्त असल्याचेही दिसून आल्याने रुग्णालयाकडून तिला उपचार उपलब्ध करुन देण्यात आले आहेत़ तूर्तास याठिकाणी संशयित रुग्णांची संख्या वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ सिकलसेल हा दुर्धर आजार असल्याने त्याची काळजी घेणे सक्त गरजेचे आहेत़ बाधितांनी योग्य ते उपचार न घेतल्यास पक्षाघाताचा झटका येऊन विद्यार्थी दगावण्याची भिती असते़ यामुळे आश्रमशाळा प्रशासनाही विद्यार्थ्यांची योग्य पद्धतीने देखभाल करत आहे़ खोंडामळी रुग्णालयाच्या डॉ़ सुलोचना बागुल यांनी या बालकांसाठी खर्च करण्याची तयारी दर्शवली असून बालकांनी वेळेवर गोळ्या घ्याव्यात यासाठी चार्ट तयार करुन देण्यात आला आहे़

४जिल्ह्यात सिकलसेलच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत़ यात लहान बालकांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेची बाब आहे़ यावर पर्याय म्हणून जिल्हा रुग्णालयाने जिल्ह्यात तीन ठिकाणी जन्म घेणाºया प्रत्येक बाळाची जन्मत:च सिकलसेल चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे उपचार पद्धती सोपी होण्याचा दावा होत आहे़
४दुसरीकडे शासकीय आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांच्या तपासणीचा प्रश्न यातून पुढे आला असून दोन्ही प्रकल्पात अशा तपासण्या गेल्या अनेक महिन्यात झालेल्याच नाहीत़

Web Title: 3 students disrupted by sickle at Coal Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.