बालमेळाव्यात ७५० बालकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:52 PM2020-02-14T12:52:56+5:302020-02-14T12:53:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नर्मदा बचाव आंदोलनामार्फत चालविण्यात येणाऱ्या जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बालमेळाव्याचे उद्घाटन गुरूवारी तालुक्यातील तºहावद पुनर्वसन ...

3 children participate in child fairs | बालमेळाव्यात ७५० बालकांचा सहभाग

बालमेळाव्यात ७५० बालकांचा सहभाग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : नर्मदा बचाव आंदोलनामार्फत चालविण्यात येणाऱ्या जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बालमेळाव्याचे उद्घाटन गुरूवारी तालुक्यातील तºहावद पुनर्वसन येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मेळाव्यात साधारण ७५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या बाल मेळाव्व्यात विविध मैदानी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे.
सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या मुला-मुलींसाठी नर्मदा बचाव आंदोलन निवासी जीवन शाळा गेल्या अनेक वर्षापासून चालवित आहे. या जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आंदोलनामार्फत बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. चार दिवसीय बाल मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध लेखिका डॉ.श्रृती पानसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, माजी खासदार मिनाक्षी नटराजन, चिन्मय मिश्रा, लवासा आंदोलनाच्या सुनिती सूर, मेधा पाटकर, सर्पदंश संस्थेच्या प्रियंका कदम, इब्राहिम खान, युवराज गटकर, हैदर नुरानी, माणक चौधरी, प्रा.प्रदीप पाटील, अनिल कुवर, हनिफ तडवी, सरपंच विश्रांती वळवी अशा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या बाल मेळाव्यात सात जीवन शाळांमधील साधारण ७५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुले सोडून प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांी आपला झेंडा रोवला होता. साहजिकच यामुळे परिसरातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले होते. या वेळी लेखिका श्रृती पानसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आंदोलनामार्फत सुरू असलेल्या शायांमध्ये जीवनाचे शिक्षण दिले जात असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपोआपच स्वालंबनाचे धडे मिळत असतात. तसेच शाळेच्या विकासासाठी पालकांबरोबरच कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थीही मेहनत घेत असतात. या वेळी त्यांनी विद्यार्थी शिक्षकांशी सुसंवाद साधला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांनी जीवन शाळांना जिल्हा परिषदेकडून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी आपल्यापुढे सगळ्याच समस्यांचा डोंगर उभार आहे. तरीही हिंमत न हारता दुर्गम, वंचित भागातील विकासाकरीता पुरेपूर प्रयत्न करीत आहे. चंदन मिश्रा, सुनिता सूर यांनीही मार्गदर्शन केले होते. प्रास्ताविक तुकाराम पावरा यांनी केले.
सूत्रसंचालन आंदोलनाचे कार्यकर्ते चेतन साळवे यांनी मानले. कार्यक्रमासाठी लतिका राजपूत, जातर वसावे, पुन्या वसावे, ओरसिंग पटले, शामजी पाडवी, सियाराम पाडवी, दिलवर पाडवी, जीवन शाळांचे सर्व शिक्षक, पालक परिश्रम घेत आहेत.

 


नर्मदा बचाव आंदोलनामार्फत गुरूवारी सुरूवात करण्यात आलेल्या जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बाल मेळाव्यात दिवसा कबड्डी, खो-खो, लांब उडी, उंच उडी, धनुर्विद्या, लिंबू चमचा अशा विविध मैदानी स्पर्धांबरोबरच चित्रकला, वक्तत्व स्पर्धा व वैयक्तिक नृत्य, सांघिक नृत्य, गीत गायन, नाटीका, आदिवासी नृत्ये अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची तब्बल चार दिवस रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमात पुणे-मुंबई येथील कलाकारदेखील सहभागी होणार आहेत.

Web Title: 3 children participate in child fairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.