शहाद्यात १०० खाटांचे विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:46 IST2020-03-21T11:46:20+5:302020-03-21T11:46:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जगभरात कोरोना व्हायरस या आजाराच्या प्रादुर्भाव वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहादा तालुका आपत्ती ...

3 bed separation chamber in martyr | शहाद्यात १०० खाटांचे विलगीकरण कक्ष

शहाद्यात १०० खाटांचे विलगीकरण कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : जगभरात कोरोना व्हायरस या आजाराच्या प्रादुर्भाव वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहादा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहादा येथील शासकीय आश्रमशाळेत १०० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक या सुविधा पुरविण्यासाठी पुन्हा प्रयत्न असल्याचे प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी सांगितले.
यानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत प्रांताधिकारी डॉ.गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पेंढारकर, मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, गट विकास अधिकारी गोसावी, गटशिक्षण अधिकारी उषा पेंढारकर आदी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहादात तालुका स्तरावर ती तालुका प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहे. दरम्यान कोरोना आजाराबाबत लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. या माध्यमातून ठिकाणी फलके व ध्वनिक्षेपकाच्या आधारे प्रचार केला जात आहे. त्यात माध्यमातून जनतेने घाबरू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
शहादा शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहादे शहरापासून चार किलोमीटर अंतरवरील मामाच्या मोहीदे शिवारात शासकीय तंत्र निकेतन, शासकीय आश्रमशाळा व आयटीआय या तीन ठिकाणी १०० खाटांचे कोरोना टाईम कक्ष स्थापन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्वल्यास या ठिकाणी पुन्हा शंभर बेडची व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आला. तेथे परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे देखील आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

Web Title: 3 bed separation chamber in martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.