विसरवाडी येथे झेरॉक्स दुकानासाठी २८ हजाराची वीज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST2021-02-18T04:59:08+5:302021-02-18T04:59:08+5:30
नंदुरबार : झेरॅाक्स दुकानासाठी तब्बल २८ हजार ४५० रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार विसरवाडी येथे उघडकीस आला. याबाबत एकाविरुद्ध ...

विसरवाडी येथे झेरॉक्स दुकानासाठी २८ हजाराची वीज चोरी
नंदुरबार : झेरॅाक्स दुकानासाठी तब्बल २८ हजार ४५० रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार विसरवाडी येथे उघडकीस आला. याबाबत एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विसरवाडी येथील गाव चौकात मनोज विनायक वळवी यांचे झेरॅाक्सचे दुकान आहे. या दुकानासाठी त्यांनी अधिकृत वीज जोडणी न घेता वीज तारांवर आकोडा टाकून त्यांनी जोडणी घेतली. त्याद्वारे त्यांनी एक हजार ९२५ युनिट वीज चोरी केली. त्याची किंमत तब्बल २८ हजार ४५० रुपये इतके होते.
नंदुरबार येथील भरारी पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता त्यांना वीज चोरीचा हा प्रकार दिसून आला. याबाबत भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा विसरवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.