मुख्याध्यापक कार्यालयातून २८ हजार रोख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:01+5:302021-03-19T04:29:01+5:30

नंदुरबार : शाळेतील मुख्याध्यापक कार्यालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी २८ हजार २५० रुपये रोख चोरून नेल्याची घटना चिंचपाडा, ता.नवापूर येथे ...

28,000 cash lampas from the headmaster's office | मुख्याध्यापक कार्यालयातून २८ हजार रोख लंपास

मुख्याध्यापक कार्यालयातून २८ हजार रोख लंपास

नंदुरबार : शाळेतील मुख्याध्यापक कार्यालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी २८ हजार २५० रुपये रोख चोरून नेल्याची घटना चिंचपाडा, ता.नवापूर येथे घडली. नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, चिंचपाडा येथे मॅन्यूअल पब्लिक स्कूल आहे. मिशन कंपाऊंडमधील या शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयात ही चोरी झाली. कार्यालायाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आतील लोखंडी कपाटात ठेवलेले रोख २८ हजार २५० रुपये चोरून नेले. १७ मार्च रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली असता खळबळ उडाली. नवापूर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून तसेच ठसे घेऊन चोरीचा तपास सुरू केला.

याबाबत मुख्याध्यापक नेपालरेड्डी विरारेड्डी मन्यम, रा.चिंचपाडा यांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार बळवंत वळवी करीत आहे.

Web Title: 28,000 cash lampas from the headmaster's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.