शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील 28 जणांना झाली डेंग्यूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:52 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले 28 रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले 28 रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ आरोग्य यंत्रणांनी संकलित केलेल्या रक्तनमुने तपासणीनंतर ही आकडेवारी समोर आली आह़े        नवापुरपाठोपाठ गेल्या दोन आठवडय़ांपासून नंदुरबार शहरात डेंग्यूचा फैलाव झाला आह़े यात 18 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्यानंतर नगरपालिका, हिवताप आणि आरोग्य विभाग यांच्याकडून शहरात जनजागृती व रासायिक औषध फवारणी सुरु करण्यात आली होती़ नंदुरबार पालिकेने गेल्या चार दिवसात शहराचे चार विभाग करुन फवारणी केली आह़े यात सिंधी कॉलनी ते राजेंद्र नगर भाग 1, जुना बैल बाजार ते अलीसाब मोहल्ला भाग 2, साक्री नाका ते बागवान गल्ली, रायसिंग पुरा ते अहिल्याबाई विहिर भाग 3 आणि गाजीनगर ते गांधीनगर भाग 4 येथे औषध फवारणी करणयात आली आह़े तब्बल 150 ठिकाणी फवारणी करुन कर्मचा:यांनी जनजागृती केली होती़ आरोग्य यंत्रणेकडून डेंग्यूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असताना जिल्ह्यातील 368 जणांचे रक्तनमुने संकलित करण्यात आले होत़े यात 22  जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होत़े यात 19 नवापुर, नंदुरबार 3, शहादा 1 तर तळोदा शहरात दोघे डेंग्यूने बाधित असल्याचे सांगण्यात आले आह़े गेल्या दोन दिवससात आरोग्य यंत्रणेने एका खाजगी रुग्णालयात केलेल्या सव्रेक्षणात 19 जण दाखल असल्याचे समोर आले होत़े यातील 6 जणांना डेंग्यूची बाधा झाल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान रविवारी खासदार डॉ़ हीना गावीत यांनाही डेंग्यूची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्यांच्या खोडाई माता रोडवरील निवासस्थान व परिसरात स्वच्छता करुन तपासणी करुन स्वच्छता केल्याची माहिती देण्यात आली आह़े याठिकाणी डेंग्यूचे डास आढळून आलेले नसल्याचे सांगण्यात आल़े