जिल्ह्याच्या आरोग्याची झाडाझडती घेण्यासाठी २८ अधिकारी दाैर्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:27 PM2020-10-28T12:27:16+5:302020-10-28T12:27:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या साथीनंतर जिल्ह्यातील रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करुन जनतेस येणार्या अडचणींचा आढावा ...

28 officers on duty to take care of the health of the district | जिल्ह्याच्या आरोग्याची झाडाझडती घेण्यासाठी २८ अधिकारी दाैर्यावर

जिल्ह्याच्या आरोग्याची झाडाझडती घेण्यासाठी २८ अधिकारी दाैर्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या साथीनंतर जिल्ह्यातील रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करुन जनतेस येणार्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागातील संचालक दर्जाचे २८ वरीष्ठ अधिकारी जिल्हा दाैर्यावर आले आहेत. मंगळवारी दाैर्याच्या पहिल्या दिवशी आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परीषदेत जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकार्यांची बैठक झाली. 
सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व  प्राथमिक आरोग्य  केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान वैयक्तिक लाभाच्या योजनांसह कुपोषण व आरोग्य योजनांची माहिती घेत  अधिकार्यांना सूचना करण्यात आल्या. दरम्यान बुधवारी सकाळी प्रत्येकी तीन अधिकार्यांचे पथक सर्व सहा तालुक्यात रवाना होणार आहे. याठिकाणी त्यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देत माहिती घेतली जाणार आहे. तसेच वित्त व लेखा विभागाचे संचालक नंंदुरबार मुख्यालयी थांबून आरोग्य विभागाने केलेल्या खर्चाचा लेखाजोखा घेणार असल्याची मााहिती देण्यात आली आहे. एकाचवेळी जिल्ह्यात संचालक दर्जाचे एवढे अधिकारी आल्याने प्रशासनाचे भंबेरी उडाल्याचे दिसून आले.  

संचालकांच्या दाैर्यामुळे आरोग्य केंद्र झाडून पुसून तयार 

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आरोग्य संचालनालयाच्या अधिकार्यांच्या दाैर्याच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागासह सर्व सहा तालुक्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्र, १३ ग्रामीण रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालये झाडून पुसून स्वच्छ करण्यात आली आहेत. 
बुधवारी पहिले पथक धडगाव तालुक्याकडे रवाना होणार आहे. धडगाव, अक्कलकुवा या दोन तालुक्यात सहा संचालक व युनिसेफचे दोन अधिकारी अशी दोन स्वतंत्रे पथके निर्माण केली गेली आहेत. ३० रोजी दाैरा पूर्ण होण्यापूर्वी जिल्हा परीषदेत आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांची उपस्थिती राहणार आहेत. त्यांच्यासमोर समितीने केलेल्या दाैर्यातील निरीक्षणे मांडली जाणार आहेत. या दाैर्यातून आंकांक्षित नंदुरबार जिल्ह्यासाठी आरोग्य अंतर्गत स्वतंत्र निधीची योजना अंमलात येण्याची शक्यता आहे. 

Web Title: 28 officers on duty to take care of the health of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.