मिशन हरीत सातपुडासाठी २५ लाख रोपे झाली तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:34 IST2020-06-26T12:34:12+5:302020-06-26T12:34:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा १ जुलैपासून मिशन हरीत सातपुडा सुरु होणार आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून अंमलबजावणी होणाºया ...

25 lakh saplings were ready for Mission Harit Satpuda | मिशन हरीत सातपुडासाठी २५ लाख रोपे झाली तयार

मिशन हरीत सातपुडासाठी २५ लाख रोपे झाली तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा १ जुलैपासून मिशन हरीत सातपुडा सुरु होणार आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून अंमलबजावणी होणाºया या योजनेत वनविभागाकडून मोलाचे कामकाज होत असून सुमारे २५ लाख रोपांची लागवड होणार आहे़ आजअखेरीस जिल्ह्यात शहादा आणि मेवासी वनविभागाने १९ लाख खड्डे खोदून तयारी पूर्ण केली आहे़
चार कोटी वृक्ष लागवड योजनेत राज्यातून पहिल्या दहा जिल्ह्यात स्थान मिळवणाºया नंदुरबार जिल्ह्यात यंदा कोट्यावधी झाडे लागवड करण्यापेक्षा गेल्या वर्षात लागवड केलेल्या झाडांचे योग्य ते संगोपन करुन मर आलेली झाडे पुन्हा सुस्थितीत आणण्याचे काम केले जाणार आहे़ यांतर्गत सातपुडा हरीत करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला होता़ यांतर्गत वनविभागाने आजअखेरीस १९ लाख झाडांची निर्मिती पूर्ण केली आहे़ शहादा आणि तळोदा मेवासी वनविभागाच्या ३६ च्या जवळपास असलेल्या रोपवाटिकांमध्ये ही झाडे गेल्या जानेवारी महिन्यापासून तयार करण्याचे काम सुरु होते़ यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचाही समावेश करण्यात आला असून यांतर्गत सुमारे १ लाख झाडांची लागवड करुन त्यांचे रोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी रोपवाटिकांमध्ये मजूरांना पाचारण करुन कामकाज करण्यावर वनविभागाने भर दिला होता़ सोबत जागोजागी सीसीटी समतल चर तयार करण्यात आले असून यातही वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि जिल्ह्यातील ५८६ ग्रामपंचायती यांच्यामार्फत विविध योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्था, शाळा आणि सामान्य नागरिक यांनाही वनविभागाकडून वृक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

जिल्ह्यात मिशन हरीत सातपुडा या योजनेंतर्गत १९ लाख रोपे तयार आहेत़ त्यासाठी १९ लाख खड्डे रोहयोच्या माध्यमातून खोदले गेले आहेत़ यात नंदुरबार-शहादा वनविभागाने साडेसहा लाख रोपे लागवड करण्याचे नियोजन केले आहे़ मेवासी वनविभाग तळोदा यांनी ३ लाख १५ हजार तर सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायतींना सात लाख रोपांच्या लागवडीचे उद्दीष्ट्य देण्यात आले आहे़
४रोहयोंतर्गत १ लाख रोपांची लागवड करण्याचा निर्णयही वनविभागाने घेतला आहे़ नंदुरबार विभागांतर्गत नवापूर शहर, चिंचपाडा, देवमोगरा ता़ नवापूर, ठाणेपाडा ता़ नंदुरबार याठिकाणी वनविभागाने रोपे तयार केली आहेत़ वनविभागाने तयार केलेल्या सीसीटीच्या कामात सात लाखांपेक्षा अधिक रोपे उगणवणार आहेत़ याठिकाणी बिया रोवण्याचे काम सध्या मजूरांकडून सुरु आहे़

जिल्ह्यात वनविभागाच्या मार्गदर्शनात २०१९ या वर्षात वृक्ष लागवड योजनेंतर्गत ९१ लाख ४४ हजार झाडांची लागवड झाली होती़ यातील नंदुरबार वनविभागांतर्गत लागवड केलेली २६ लाख झाडे ही सुस्थितीत आहेत़ विभागाने ३१ झाडांची लागवड केली होती़ उर्वरित पाच मर आलेली झाडे यंदा काढून त्याठिकाणी पु्न्हा नव्याने रोप लागवड होणार आहेत़
२०१८ या वर्षात जिल्ह्यात ४८ लाख ५० हजार झाडांची लागवड केली होती़ यातील ८० टक्के झाडे जगल्याचा अहवाल वनविभागाने दिला आहे़
२०१७ या वर्षात जिल्ह्यात १६ लाख ५० हजार झाडे रोवण्यात आली़ या झाडांची स्थिती चांगली असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे़
यंदा जून महिन्यात पाऊस झाल्याने वनविभागाने रोपांची लागवड सुरु केली असल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: 25 lakh saplings were ready for Mission Harit Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.