गोडावूनमधून 24 हजारांचा ऐवज चोरीस
By Admin | Updated: January 9, 2017 23:05 IST2017-01-09T23:05:19+5:302017-01-09T23:05:19+5:30
40 हजारांचे सीसीटीव्ही कॅमे:यांचे नुकसान करून 24 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.

गोडावूनमधून 24 हजारांचा ऐवज चोरीस
नंदुरबार : अक्कलकुवा येथे गोडावूनमधून चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटय़ांनी 40 हजारांचे सीसीटीव्ही कॅमे:यांचे नुकसान करून 24 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी गावातीलच दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अक्कलकुवा येथील मुख्य रस्त्यावर मिठाफळी भागात कमलेश प्रेमचंद जैन यांचे गोडावून आहे. या गोडावूनमधून चोरी करण्याच्या उद्देशाने मोठी राजमोही येथील इंद्रजीत शंकर वळवी व नयमोद्दीन हबीअली मक्राणी यांनी प्रवेश केला. गोडावून परिसरात व मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याचे लक्षात आल्यावर दोघांनी 40 हजार रुपये किमतीचे कॅमेरे फोडून टाकले. शिवाय दहा हजाराचा एलईडी टीव्हीदेखील फोडून टाकला. त्यानंतर 10 हजार रुपये किमतीची विद्युत मोटर व चार हजार रुपये किमतीचे अजवानचे दोन कट्टे चोरून नेले.
सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर गोडावून मालक कमलेश जैन यांनी फिर्याद दिली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांकडून चार हजार रुपये किमतीचे अजवान जप्त केले आहे.