नवापुरात दिवसभरात २१ हजार कोंबड्यांना मारून पुरले, बर्ड फ्ल्यूवर उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:03+5:302021-02-08T04:28:03+5:30
नवापूर : येथील चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आज जिल्हा प्रशासनाने या पोल्ट्रीतील चार लाख कुक्कुट ...

नवापुरात दिवसभरात २१ हजार कोंबड्यांना मारून पुरले, बर्ड फ्ल्यूवर उपाययोजना
नवापूर : येथील चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आज जिल्हा प्रशासनाने या पोल्ट्रीतील चार लाख कुक्कुट पक्षी नष्ट करण्यास आज पासून सुरुवात झाली सकाळी दहा वाजेपासून पिंपळनेर चौफुलीवरील डायमंड पोल्ट्रीत प्रशासनाने जलद गतीने कोंबड्यांच्या किलिंग चे काम सुरू केले आहे. दिवसभरात २१ हजार कोंबड्यांना मारून त्या पुरण्यात आल्या. या ठिकाणी येत्या चार दिवसांमध्ये दीड लाख कोंबड्यांचे किलिंग केला जाणार आहे, तर अन्य पोल्ट्री फार्म वर निगराणी ठेवली जाणार आहे. तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मच्या कोंबडीचे नमुने हे बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.
या ठिकाणी नाशिक, नगर ,जळगाव,धुळे अशा उत्तर महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. १०० पथकांच्या माध्यमातून या ठिकाणी किलिंग चर काम केले जात आहे. चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे.
नवापुर पिंपळनेर चौफुली नजीक असलेल्या डायमंड पोल्ट्रीमध्ये साधारण २०० पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत २१ हजार कुकुट पक्षांना नष्ट केले आहे. त्याआधी सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट परिधान करून सर्वांना टॉमी फ्लूचे औषध देऊन पोल्ट्री मधील शेडमध्ये पक्षी नष्ट करण्यासाठी पथके रवाना केली. शास्त्रशुद्ध पद्धतीने कुक्कुट पक्षी ना जेसीबीच्या साह्याने खड्डा करून त्यात चुना निर्जंतुकीकरण औषध टाकून पुरविण्यात आले आहे.सर्वात आधी डायमंड पोल्ट्री मधील कोंबड्यांना पाण्यात बेशुद्धीचे औषध टाकले त्यानंतर कुकुट पक्षांना किलिंग करण्याची प्रक्रिया राबवण्यात आले.