फिलिपाईन्सहून आले २१ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:13 IST2020-05-14T13:13:28+5:302020-05-14T13:13:35+5:30

नवापूर : फिलिपाईन्स देशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या राज्यातील २१ विद्यार्थ्यांना नवापुर येथुन एस टी मधुन त्यांच्या गावी पाठविण्यात आले. ...

21 students came from the Philippines | फिलिपाईन्सहून आले २१ विद्यार्थी

फिलिपाईन्सहून आले २१ विद्यार्थी

नवापूर : फिलिपाईन्स देशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या राज्यातील २१ विद्यार्थ्यांना नवापुर येथुन एस टी मधुन त्यांच्या गावी पाठविण्यात आले. अहमदाबाद येथे विशेष विमानाने हे विद्यार्थी आले होते. राज्यातील विविध भागातील विद्यार्थी फिलिपाईन्स देशात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. लॉकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुक बंद झाल्याने हे सर्व विद्यार्थी तेथेच अडकले होते. लॉकडाउनमधे प्रवासाला मुभा मिळाल्याने बुधवारी दुपारी एका विशेष विमानाने २१ विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथे आणण्यात आले. तहसिलदार उल्हास देवरे, आगार प्रमुख राजेंद्र अहिरे व इतर अधिकारी रात्री उशिरापावेतो सीमा परिवहन तपासणी नाक्यावर हजर होते. दरम्यान, नवापूर आगाातून १० मे पासून बस फेºया सुरू करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेश सिमेवर बिजासन पयंत ६० बसेस, गोंदिया येथे सहा व इतर ठिकाणी बस सोडल्या गेल्या.


’तापी जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तापी जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या राज्यातील प्रवासासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचेशी बोलणी केल्याने त्यांच्यासाठी नवापुर आगाराकडुन दोन बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या.
’पहिली बस धुळे, जळगांव मार्गे भंडारा पावेतो पाठविण्यात आली. त्यात धुळे, जळगांव व भंडारा येथील प्रत्येकी एक, गोंदिया व नागपुर येथील प्रत्येकी दोन व अकोला येथील पाच विद्यार्थी होते. दुसरी बस धुळे, औरंगाबाद मार्गे वाशिम पावेतो पाठविण्यात आली. जालना, वाशिम व नांदेड येथील प्रत्येकी एक व बुलढाणा येथील सात विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Web Title: 21 students came from the Philippines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.