१४ जणांना सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:00 IST2020-02-09T12:00:18+5:302020-02-09T12:00:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिलेला मारहाण करुन विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ...

2 people sentenced to hard labor | १४ जणांना सश्रम कारावासाची शिक्षा

१४ जणांना सश्रम कारावासाची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महिलेला मारहाण करुन विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली.
याबाबत या खटल्याची हकीकत अशी, सोनखडके, ता.नवापूर येथे राहणारी महिला व गावातीलच तुळशिराम केश्या गावीत व त्याची पत्नी यांच्यात शेतीवरुन वाद होता. २६ जुलै २०१४ रोजी रोजी सायंकाळी ५ वासता फिर्यादी व फिर्यादीची सुन घरी असताना तुळशिराम केश्या गावीत व त्यांची पत्नी यांनी घरात घुसुन वाद घातला. त्यानंतर पुन्हा तुळशीराम केश्या गावीत, जेरमीबाई तुळशीराम गावीत, दावित तुळशीराम गावीत, रायश्या केश्या गावीत, संपत शिवा गावीत, राजु सारजी गावीत, बाला राश्या गावीत, रविंद्र जया गावीत, सुगाडया गावीत, प्रवीण विनोद गावीत, वसान्या रावजी गावीत, गोवजी वेचा गावीत, नोटा गोवल्या गावीत, साया थोटया गावीत यांनी घरात घुसुन महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली. तुळश्या केश्या गावीत व दावित तुळशीराम गावीत अश्यांनी हाताबुक्यांनी मारहाण करुन महिलेचे कपडे फाडत विनयभंग केला. मारहाणीत महिला बेशुद्ध झाली होती. तिला उपचारासाठी नवापुर ग्रामीन रुग्णालयात दाखल केले होते.
महिलेच्या फिर्यादीवरून नवापूर पोलिसात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमादार सुभाष काटके यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्या. राजीव बा.बहिरवाल यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने सर्व साक्षी, पुरावे लक्षात घेवून सर्वच १४ जणांना तीन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी १२ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. फिर्यादी महिलेस प्रत्येक आरोपीच्या दंडातुन दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असे आदेश केले आहेत.
सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.अजय सुरळकर यांनी पाहीले आहे. सदर खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन हवालदार प्रमोद पाठक होेते.

मारहाणीच्या गुन्ह्यात एकाच वेळी सर्वच १४ आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा झाल्याने पिढीत महिलेने समाधान व्यक्त केले आहे. वरच्या न्यायालयात देखील ही शिक्षा कायम राहते किंवा कसे याकडे आता लक्ष लागून आहे. शेतीच्या किरकोळ वादातून हा प्रकार सोनखडके, ता.नवापूर येथे सहा वर्षांपूर्वी घडला होता. एकाच गावातील एवढ्या मोठ्या संख्येने आरोपी असल्याने गावाचेही लक्ष या निकालाकडे लागून होते.

Web Title: 2 people sentenced to hard labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.