भिशीच्या पैश्यातून ३७ लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:29 IST2020-03-20T12:29:13+5:302020-03-20T12:29:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भिशीचे ३७ लाख रुपये घेऊन पोबारा करणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

भिशीच्या पैश्यातून ३७ लाखाची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भिशीचे ३७ लाख रुपये घेऊन पोबारा करणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ गेल्या अनेक दिवसांपासून शहरात या प्रकाराची चर्चा सुरु होती़
सुभाष छगन चौधरी, प्रमिलाबाई सुभाष चौधरी व बाली चौधरी असे रक्कम घेऊन पसार झालेल्या तिघांची नावे आहेत़ एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०१९ दरम्यान देसाई पुºयातील पुष्पांजली चक्कीसमोर राहणारे सुभाष, प्रमिलाबाई आणि बाली चौधरी या तिघांनी मिळून नंदुरबार शहरात घरसंसार नॉॅव्हेल्टीज या नावाने भिसी सुरु केली होती़ शासकीय नियमानुसार भिशीचे काम करत असल्याचे सांगून त्यांनी अनिरुद्ध रतिलाल मराठे यांच्याकडून १५ लाख, सिमा चंद्रकांत साळवे यांच्याकडून १२ लाख, अर्चना वासुदेव सोनार व योगिता मनोज सटाणकर या दोघींकडून १० लाख रुपये अशी ३७ लाख रुपयांची रक्कम गोळा केली होती़ दरम्यान रक्कम गोळा केल्यानंतर पतीपत्नीसह बाली चौधरी हा नंदुरबार शहरातून अचानक गायब झाले होते़ याप्रकाराची शहरात बºयाच दिवसांपासून चर्चा सुरु होती़ परंतू कोणीही फिर्याद देण्यास पुढे आले नव्हते़ शेवटी फसवणूक झालेले अनिरुद्ध मराठे यांनी शहर पोलीस ठाण्यात भेट देत माहिती दिली होती़ त्यांच्या फिर्यादीवरुन सुभाष व प्रमिलाबाई चौधरी या दाम्पत्यासह बाली चौधरी या तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ करत आहेत़
गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण शहरात चर्चिले जात होत़े़ फसवणूकीच्या रकमेचा आकडा हा मोठा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता़ दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील फसवणूकीची रक्कम ही २५ लाखांच्या पुढे असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे़ पोलीसांकडून तशी कारवाई येत्या काळात होऊ शकते़ दरम्यान पोलीसांनी तिघांचा शोध सुरु केला असून त्यांचे बँक खाते आणि इतर कागदपत्रांच्या तपासणीकडे लक्ष दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे़