३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 01:51 PM2020-02-25T13:51:59+5:302020-02-25T13:52:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील १९ जिल्ह्यात १ हजार ५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे़ ...

2 Gram Panchayat elections | ३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

३८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यातील १९ जिल्ह्यात १ हजार ५०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे़ यात नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यामधील ३८ ग्रामपंचायती समाविष्ट असून येत्या महिनाभर याठिकाणी रणधुमाळी राहणार आहे़
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे़ या संबधीचे आदेश दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक विभागाला प्राप्त झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात करत अधिसूचनाही लागू करण्यात आली आहे़ शहादा, तळोदा, धडगाव आणि नवापुर या चार तालुक्यात हा निवडणूक कार्यक्रम लागू करण्यात आला असून सर्व ३८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे़ जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकीच्या हालचाली गेल्या महिन्यापासून सुरुच होत्या़ स्थानिक स्तरावर कार्यकाळ पूर्ण झाल्याची माहिती असल्याने अनेकांनी तयारीही सुरु केली होती़ जिल्हा परिषद निवडणूकीनंतर कमी कालावधीत निवडणूका होत असल्याने वातावरण रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ निवडणूका जाहिर झालेली बहुतांश गावे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याने निवडणूका रंगणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम झाला होता़ यातील शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील काही ठिकाणी प्रभागात सदस्यपदे रिक्त आहेत़ या गावांचा पोटनिवडणूक कार्यक्रम मात्र यावेळी जाहिर झालेला नसल्याची माहिती आहे़ तब्बल महिनाभर सुरु राहणाऱ्या या निवडणूक कार्यक्रमासाठी तालुका निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन तालुकानिहाय कक्ष सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़

शहादा तालुक्यातील असलोद, न्यू असलोद, राणीपूर, नागझिरी आणि कोटबांधणी येथे निवडणूक कार्यक्रम होणार आहे़
तळोदा तालुक्यातील बंधारा, राणीपूर, पाडळपूऱ
नवापुर तालुक्यातील धनराट, धुळीपाडा, वडकंळबी, उकळापाणी, रायंगण, कोठडा, नांदवण, उमराण, केडापाडा, बंधारपाडा, केळी, ढोंग, पळसून आणि सागाळी़
धडगाव तालुक्यातील धनाजे बुद्रुक, भोगवाडे खुर्द, उमराणी बुद्रुक, घाटली, खामला, काकरदा, आचपा, मुंदलवड, मनवाणी, खर्डा, सिसा, काकरपाटी, पाडली़ वरखेडी बुद्रुक, कुंडल आणि हातधुई या ग्रामपंचायतीत निवडणूक कार्यक्रम होणार आहे़
सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच अशी निवड होणार असल्याने येत्या काळात सरपंचपदासाठी गत पाच वर्षांपासून मोर्चेबांधणी करणाºया इच्छुकांची धावपळ सुरु होणार आहे़ सर्वच ठिकाणी प्रथमच लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे़ येत्या काही दिवसात होलिकोत्सवही साजरा होणार असल्याने या निवडणूक कार्यक्रमाचे महत्त्व वाढले आहे़

निवडणूक जाहिर झालेल्या सर्वच ३८ गावांमध्ये सोमवारपासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती प्रशासकीय स्तरावरुन देण्यात आली आहे़ निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेल्या सर्वच ग्रामपंचायतींची मुदत ही एप्रिल ते जून २०२० या दरम्यान संपणार असल्याने निवडणूक कार्यक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती आहे़ आजपासून अधिसूचना लागू झाली असली तरी इच्छुकांना येत्या ६ ते १३ मार्च दरम्यान नामनिर्देशन दाखल करता येणार आहेत़ दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी १६ मार्च रोजी होणार असून १८ रोजी माघारीची अंतीम मुदत आहे़ माघारीनंतर चिन्हांचे वाटप होणार आहे़

Web Title: 2 Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.