नऊ शाळांमधील 199 विद्यार्थी उघडय़ावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 20:32 IST2019-11-09T20:32:53+5:302019-11-09T20:32:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : उपेक्षित बालकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु ...

199 students from nine schools open | नऊ शाळांमधील 199 विद्यार्थी उघडय़ावर

नऊ शाळांमधील 199 विद्यार्थी उघडय़ावर

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : उपेक्षित बालकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु 25 वर्षाचा कालावधी उलटूनही तळोदा तालुक्यातील नऊ शाळांसाठी इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थी आजही उघडय़ावरच ज्ञानार्जन करीत आहेत.  
जिल्ह्यातील बालकांमध्ये विकासाच्या दृष्टीने जळण-घळण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत मराठी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातील बहुतांश शाळांना शासनामार्फत तालुक्यातील स्वतंत्र इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या. परंतु या त्यात विकासापासून वंचित राहिलेल्या तळोदा तालुक्यातील केलवापाणी, कुवलीडाबर, मोठीबार, विहीरीमाळ, मोकसमाळ, धजापाणी बोंडमाळ, नायामाळ, सोजरबार येथील शाळांनाही प्रशासनाने वाळीत टाकले आहे. या नऊही शाळांसाठी   अद्याप इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे नऊही शाळांमधील 199 विद्याथ्र्याना उघडय़ावरुनच ज्ञानार्जन करण्यात येत आहे. उघडय़ावर शिक्षण दिले जात असल्यामुळे या विद्याथ्र्याचे  भवितव्य मोकळ्या आभाळी घडविले जात असून ते काही अंशी धोक्याचे देखील ठरत आहे. ठिकाणी देखील शाळा सुरू करण्यात आल्या  आहे. 
या नऊ शाळा सुरु होऊन 22 ते 25 वर्षाचा कालावधी उलटूनही या शाळांना इमारती उपलब्ध करुन देण्यासाठी कुठल्याही प्रशासनाने दखल घेतली नाही. इमारती उपलब्ध करुन देण्यासाठी तालुक्यातील पालकांमार्फत मुख्य कार्यकारी अधिका:यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर राजेंद्र पाडवी, अनिल ठाकरे, रुबाबसिंग ठाकरे, कालुसिंग वसावे, सुनील पाडवी, उदेसिंग वळवी, जगन ठाकरे, गुलाबसिंग पाडवी,  रतिलाल पावरा, कालुसिंग वसावे, दयानंद चव्हाण यांच्या सह्या   आहेा. 

केलवापाणी, मोठीबार, विहीरीमाळ, धजापाणी या ठिकाणी उन्हाळ्याच्या कालावधीत मोठी वाहनेही जातात. त्यामुळे शाळेसाठी इमारतीचे बांधकाम होऊ शकते. परंतु रस्ताच नसल्याचा अहवाल दिला जात असल्यामुळे बांधकामाकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे देखील निवेदनात नमुद केले आहे. 
 

Web Title: 199 students from nine schools open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.