जिल्हा निर्मितीच्या 19 वर्षानी नंदुरबारात बहुप्रतिक्षीत आयकर कार्यालय अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:07 IST2018-01-16T13:07:25+5:302018-01-16T13:07:30+5:30

जिल्हा निर्मितीच्या 19 वर्षानी नंदुरबारात बहुप्रतिक्षीत आयकर कार्यालय अखेर सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या आयकर भवन कार्यालयाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यामुळे आता जिल्ह्यातील करदात्यांची धुळे येथे होणारी फिरफिर थांबणार आहे.
शहरातील रघुवंशीनगर भागातील भारती भवन येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पुणे क्षेत्राचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए.सी.शुक्ला यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला. यावेळी बोलतांना आयुक्त शुक्ला यांनी सांगितले. देशात आजही प्रामाणिकपणे आयकर भरणारे अनेकजण आहेत. परंतु काहीजण त्यापासून पळ काढतात. वास्तविक या करातूनच देशाची अर्थव्यवस्था चालते. कल्याणकारी योजनांना आणि देशाच्या रक्षण करणा:या सैन्यदलाच्या खर्चासाठी आयकराचाच पैसा सरकारला वापरावा लागतो. त्यामुळे कर चोरी करणे हा एक प्रकारे अपराधच आहे. त्यामुळे प्रत्येक करदात्याने प्रामाणिकपणे कर भरणा करून देशाप्रती आपली निष्ठा राखावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील करदात्या जनतेसाठी हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी दर बुधवारी पूर्व परवाणगीने अधिका:यांना भेटता येईल अशी सोय राहणार आहे. टप्प्याटप्याने अधिकारी व कर्मचा:यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आयकर आपल्या दारी या उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरिष चौधरी, नाशिकचे मुख्य आयकर आयुक्त असिमकुमार, ठाण्याचे एन.एन.मिश्रा, प्रधान आयकर आयुक्त शंकरलाल मिना, औरंगाबादचे एस.डी.श्रीवास्तव, के.पी.सी.राव, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, धुळ्याचे आयकर आयुक्त लाला फिलीप्स, पृथ्वीराज रघुवंशी, किशोरभाई वाणी, आयकर आयुक्त मनोज गौतम, हेमंत लेऊवा, मोहित मृणाल, राजीव केसरवाणी यांच्यासह कर सल्लागार, व्यापारी व करदाते उपस्थित होते. अमित अग्रवाल, संतोष नानकाणी, मनिषा लुणावत, किशोरभाई वाणी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन श्रीराम देशपांडे यांनी केले. आभार पी.पी.महाजन यांनी मानले.